शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयास पोलिसांच्या अडीच एकर जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:58 IST

नाशिक : पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणास देण्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर सोमवारी (दि़१८) मार्गी लागला़ मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस विभागाकडील पाच एकरपैकी अडीच एकर जागेचा ताबा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला़ या जागेमुळे न्यायालयातील पार्किंग तसेच वाढलेल्या न्यायालयाचा ...

ठळक मुद्दे जिल्हा न्यायालयाचे विस्तारीकरणप्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे ताबा

नाशिक : पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणास देण्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर सोमवारी (दि़१८) मार्गी लागला़ मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस विभागाकडील पाच एकरपैकी अडीच एकर जागेचा ताबा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला़ या जागेमुळे न्यायालयातील पार्किंग तसेच वाढलेल्या न्यायालयाचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक बार असोसिएशनसह वकिलांनी समाधान व्यक्त केले आहे़

जिल्हा न्यायालयास पोलीस विभागातील पाच एकर जागा मिळावी यासाठी अ‍ॅड़ का़ का़ घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती़ यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सद्यस्थितीत अडीच एकर जागा देण्याचे आदेश देण्यात आले होते़ या जागेबाबत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, भूमापन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते यांनी संयुक्त पाहणी करून सीमांकन केले होते़ मात्र, प्रत्यक्ष जागेचा ताबा दिल्याची कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण होती़प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी या जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला़

यावेळी तहसीलदार राजश्री अहिरराव, उपविभागीय अधिकारी अमोल येडगे, याचिकाकर्ते अ‍ॅड़ का़ का़ घुगे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रकाश आहुजा, जालिंदर ताडगे, अ‍ॅड़शरद गायधनी, अ‍ॅड़श्यामला दीक्षित, संजय गिते, हर्षल केंगे, महेश लोहिते, शरद मोगल, सोनल कदम, कमलेश पाळेकर, न्यायालयीन व्यवस्थापक दारके, भूमि अभिलेखचे तुषार पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेलार आदी उपस्थित होते़