शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या कारवाईने परिक्षार्थींची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:58 IST

नाशिक: महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने पालिकेने अनेक मिळकती सील केल्याने वाचनालये, अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ...

ठळक मुद्देआयुक्तांनी भेट घेणार: विविध संस्था, संघटनांकडून नाराजी

नाशिक: महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीचा व्यावसायिक वापर केला जात असल्याने पालिकेने अनेक मिळकती सील केल्याने वाचनालये, अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आगामी मे आणि जून महिन्यात अनेक परीक्षा असल्याने परिक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने निदान विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालये सुरू करण्याची मागणी करण्यासाठी विविध संस्था,संघटनांकडून आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे.महापालिकेच्या मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरूद्ध मोहिम उघडून पालिकेने वाचनालये, अभ्यासिका सील करण्यास सुरूवात केली आहे. तत्पूर्वी पालिकेकडून संंबधितांना नोटीसा देखील बजविल्या आहेत. या निटीसीनंतर शनिवारपासून शहरात अशाप्रकाच्या मिळकती सील केल्या जात आहेत.मनपाने शहरातील अनेक समाज मंदिरे सील केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. यावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने शहरातील काही संस्था, संघटनांचे नेते आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती सांगणार आहेत. बहुसंख्य समाजमंदिरात सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका व्यायामशाळा यांचा समावेश आहे. मे महिन्यात महाविद्यालयाच्या परीक्षा तसेच मेगाभरतीमुळे विद्यार्थी अभ्यासिकेत अभ्यास करीत आहेत. पोलीस भरतीची तयारी देखील अनेक तरुण व्यायामशाळेत जाऊन कसरत करीत आहेत. शनिवारी मनपाने अचानकपणे अनेक समाजमंदिरांना सीलबंद करून बंद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी वर्गाचे नुकसान होत आहे.समाजमंदिरे बांधतांना समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकेल ही उदात्त भावना होती. पुढे त्याचे व्यावसायिकीकरण होईल असे वाटले नव्हते. मात्र या मिळकती ज्या सेवाभावी संस्थांकडे सोपविण्यात आल्या होत्या त्यांनी व्यावसायिक वापर सुरू केल्याने मालिपेकला कारवाई करावी लागत आहे. खरेतर विद्यार्थ्यांसाठी मनपाच्या अभ्यासिका, वाचनालय आणि व्यायाम शाळा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मनपाने मे महिन्याच्या कालावधीचा विचार करून मनपा कर्मचाºयांवर जबाबदारी सोपवून या वास्तू उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.