शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कोरोनामुळे दगावलेल्यांच्या मृतदेहांची तपासणी न करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 14:49 IST

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्या भावना व मृतदेहाची तपासणी करणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता ...

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्या भावना व मृतदेहाची तपासणी करणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता पाहता यापुढे मृत व्यक्तीची तपासणी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यासंदर्भात बुधवारी गृह खात्याने आदेश जारी केले असून, त्यामुळे पोलीस व आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येणेदेखील धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत रुग्ण उपचाराअंती दगावला तर कायद्याने त्याच्या मृतदेहाचा इंक्वेस्ट पंचनामा म्हणजेच मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून त्याच्या मृत्यूचे कारण नमूद करणे फौजदारी कायदा कलम १७७ नुसार बंधनकारक करण्यात आले आहे. गुन्हेगारी कृत्यात अशी तपासणी आवश्यक असली तरी कोरोनासारख्या संसर्गरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी करणे पोलीस, डॉक्टर व नर्स यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते, तशी तक्रार पोलीस, आरोग्य यंत्रणेने केली होती. त्याची दखल घेऊन यापुढे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीची तपासणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सदरचा आदेश हा फक्त साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत लागू असणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या