शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराकडून कोयते जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:36 IST

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला मात्र जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा लावून अटक केली आहे़ सागर सुदाम दिघोळे (२६, रा़ धु्रवनगर, कार्बन नाका, सातपूर, मूळ रा़ जयेश किराणा दुकानाजवळ, मोरेमळा, पंचवटी) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले ...

ठळक मुद्देखुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला गुन्हेगार युनिट एकने सापळा लावून अटक

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला मात्र जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा लावून अटक केली आहे़ सागर सुदाम दिघोळे (२६, रा़ धु्रवनगर, कार्बन नाका, सातपूर, मूळ रा़ जयेश किराणा दुकानाजवळ, मोरेमळा, पंचवटी) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत़सराईत गुन्हेगार सागर दिघोळे हा थत्तेनगर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दिलीप मोंढे यांना मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून दिघोळे यास अ‍ॅक्सेस दुचाकीसह (एमएच १५, एफजी ५९७८) ताब्यात घेतले़ त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २२ इंच लांबीचे दोन कोयते व सायकलची चेन आढळून आली़ त्याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दिघोळे हा सराईत गुन्हेगार असून पंचवटीतील खून प्रकरणात त्यास जन्मठेपेची शिक्षा झालेली असून, सद्यस्थितीत तो जामिनावर बाहेर आहे़ याखेरीज त्याच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन व गंगापूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे़ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहायक पोलीस निरीक्षक एऩ मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, संजय पाठक, जाकिर शेख, वसंत पांडव, संजय मुळक, रवींद्र बागुल, बाळासाहेब दोंदे यांनी ही कामगिरी केली़