शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

जमावाच्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:03 IST

नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़११) मध्यरात्री घडली़ गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मृत्यूच्या ...

ठळक मुद्देविविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल महिलेची छेड केल्याने नागरिकांनी दिला़ चोपशवविच्छेदनात उलटीचे कण श्वासनलिकेत अडकल्याने श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा अंदाजव्हिसेरा ठेवला राखूनभद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़११) मध्यरात्री घडली़ गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मृत्यूच्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅँगो काळ्या याने शुक्रवारी सायंकाळी अतिमद्यसेवन केले होते़ अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाट परिसरात त्याने एका महिलेची छेड केल्याने तेथील नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला़ यामध्ये मुक्का मार लागल्याने एका जागेवर पडलेल्या मँगो काळ्याबाबत काही नागरिकांनी १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून माहिती दिली़ त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र अतिमद्यसेवन केल्याने होत असलेल्या उलट्यांमुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़जिल्हा रुग्णालयात शनिवारी मँगो काळ्याचे शवविच्छेदन करण्यात आले़ त्यामध्ये शरीराला मुक्का मार लागल्याच्या खुणा असल्या तरी त्याचा उलटीचे कण श्वासनलिकेत अडकल्याने श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़ दरम्यान, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, प्रयोगशाळेतील अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे़ दरम्यान, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सर्व शक्यता तपासण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दिली़