शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीधारकांनो, आता घ्या भटके कुत्रे दत्तक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 21:53 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त नागरिकांची ही कुचेष्टा चालवली आहे काय? असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.शहरात भटक्या कुत्र्यांचा ...

ठळक मुद्देअशासकीय सदस्याचा अजब सल्ला कुत्र्यांच्या पट्ट्यांसाठी देणगीदारांचा शोध 

नाशिक : महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त नागरिकांची ही कुचेष्टा चालवली आहे काय? असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू असून, नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढतच आहे. यापूर्वी अशाच त्रासामुळे महापालिकेने श्वान निर्बीजीकरण करण्यास प्रारंभ केला. परंतु २००७ पासून आजपर्यंत शेकडो कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचे दावे महापालिका करीत असते. परंतु त्यानंतरही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की पालिकेच्या कामावरच शंका घेतली जाते. असे असताना निर्बीजीकरणांतर्गतच महपालिकेने नियुक्त केलेल्या सनियंत्रण समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासनाच्या पशुसंवर्धन खात्याचे उपआयुक्त, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे तसेच शरण्या संस्थेच्या शरण्या शेट्टी तसेच प्राणीमित्र ऋषीकेश नाझरे आदी उपस्थित होते. यावेळी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी नाझरे यांनी परिसरातील अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावर जागा असते, तेथे भटके कुत्रे सांभाळावेत यासाठी नाझरे यांनी आवाहन केले. निर्बीजीकरण केल्यानंतर कुत्र्यांच्या कानांना ‘व्ही’ अशी खूण केली जाते. परंतु ती स्पष्ट दिसत नसल्याने निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टे बांधावे, त्यासाठी महापालिकेकडे तरदूत नसल्यास उद्योग धंद्यांच्या सामाजिक दायित्व निधी मिळवून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.