शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांना हवा कारागृहातील विघ्नहर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 21:59 IST

नाशिक : सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडू मातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये करागृहात बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. शंभर टक्के इकोफ्रेन्डली मूर्ती म्हणून कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या मूर्ती भक्तांच्या पसंतीस पडत आहेत. म्हणून या मूर्तींची ...

ठळक मुद्देसुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्तीकारागृहात बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्ती कारागृहाच्या प्रदर्शन स्टॉल्सवर विक्री

नाशिक : सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडू मातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये करागृहात बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. शंभर टक्के इकोफ्रेन्डली मूर्ती म्हणून कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या मूर्ती भक्तांच्या पसंतीस पडत आहेत. म्हणून या मूर्तींची मोठी नोंदणी झाली असून, असंख्य मूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत.नाशिकरोड कारागृहात सागर पवार हा पेणमधील कारागीर सध्या शाडू मातीच्या अतिशय रेखीव मूर्ती तयार करीत आहे. सागरच्या कलासक्त हातातून घडलेल्या मूर्ती माध्यमांसमोर आल्यानंतर या मूर्तींना राज्यातील इतर कारागृहातून मागणी होत आहेच शिवाय नाशिककरांनीदेखील या मूर्तींची मागणी नोंदविली आहे. मागणी प्रचंड असली तरी केवळ दोनशे ते अडीचशे इतक्याच मूर्ती बनविण्यात येणार असून, या मूर्ती कारागृहाच्या प्रदर्शन स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.बघताच क्षणी कुणाच्याही नजरेत भराव्यात अशा यामूर्ती आकर्षक शैलीतील आहेत. अफलातून कल्पनाशक्तीने या मूर्तींना आकार देण्यात आलेला असून, इतरत्र कोठेही अशा मूर्ती शक्यतो दिसत नाहीत. त्यामुळेच या मूर्ती बघण्यासाठी आणि घेणाºयांचीही संख्या वाढली आहे. अनेकांनी कारागृह प्रशासनाला मूर्ती बनवून देण्याची मागणी नोंदविली, मात्र ठरविल्यापेक्षा जास्त मूर्ती बनविणे शक्य नसल्याने नोंदणी स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

कारागृहातील पहिला प्रयोगनाशिकरोड कारागृहात गणेशमूर्ती प्रथमच आकारास आली आहे. यापूर्वी काराखान्यात मूर्ती कधीच घडली नाही. विविध प्रकारचे कारखाने येथे आहेत. मात्र मूर्तिकलेचा कारागीर कैदी म्हणून कारागृहात आला आणि कारागृहाला वेगळीच दिशा मिळाली. राज्यातील कोणत्याही कारागृहात गणेशमूर्ती साकारली जात नाही. ती नाशिकरोडला साकारली जाते. कारागीर सागर जोपर्यंत येथे आहे तोपर्यंत तो मूर्ती बनविणार आहेच, पण अन्य कैद्यांनादेखील तो मूर्तिकारागिरीचे प्रशिक्षणही देणार आहे.