शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रकाली पोलिसांकडून नगरसेवक शेलारांच्या चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:01 IST

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत डीजे वाजवून पोलीस आयुक्तांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा फार्स भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़९) सुमारे पन्नास पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुयोग्य पद्धतीने केला़ शेलार यांच्या पुतण्याला अटक करण्याची तत्परता दाखविणाºया भदक्राली पोलिसांना नामको ...

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत डीजे वाजवून पोलीस आयुक्तांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा फार्स भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़९) सुमारे पन्नास पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुयोग्य पद्धतीने केला़ शेलार यांच्या पुतण्याला अटक करण्याची तत्परता दाखविणाºया भदक्राली पोलिसांना नामको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा गाजविणाºया गजानन शेलारांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक व सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नगरसेवक शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला़ शेलार यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असून, त्यावर सोमवारी (दि़११) निर्णय होणार असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडे न्यायालयातील अर्जाची मागणी करण्यात आली़ मात्र, त्यांच्याकडे ती नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ या ठिकाणी त्यांच्या वकिलांनी कॉपी आणून दिल्यानंतर सुमारे अडीच तासांनी त्यांची सुटका करण्यात आली़गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी (दि़५) डीजे लावून ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्या प्रकरणी काजीपुरा चौकातील दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक गजानन शेलार, मंडळाचे पदाधिकारी राहुल उर्फ बबलू शांताराम शेलार (रा. बागवानपुरा), खजिनदार योगेश जवाहरलाल मदरेले (रा. चौक मंडई), उपखजिनदार अक्षद अनिल कमोद (रा. कमोद गल्ली) आणि डीजेचालक गणेश हिरामण तोरे (रा. वैद्यनगर) यांच्यावर भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाा़ यापैकी नगरसेवक शेलार वगळता उर्वरित चौघांना अटक भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती़न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात या चौघांना अटक केली होती़ दरम्यान, शेलार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायालय काय निर्णय देत याकडे नागरिक व पोलिसांचे लक्ष लागले आहे़