शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाची जबरदस्तीने वर्गणी मागणाºयांविरोधात खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 17:40 IST

नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जबरदस्ती ११ हजार रुपयांची वर्गणी वसूल करणारे कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार पदाधिकाºयांवर अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे़दिलीप त्र्यंबक वाघ (प्लॉट नंबर एच ११७, अंबड,नाशिक ) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या ...

ठळक मुद्देअंबड पोलीस ठाणे : तिघांना अटक ; एक फरार

नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जबरदस्ती ११ हजार रुपयांची वर्गणी वसूल करणारे कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार पदाधिकाºयांवर अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे़दिलीप त्र्यंबक वाघ (प्लॉट नंबर एच ११७, अंबड,नाशिक ) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची अंबड औद्योगिक वसाहतीत प्रतिण मशिन टूल्स नावाची कंपनी आहे़ कामगार क्रांती माथाडी संघटना प्रणित संस्कृत फाऊंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संशयित अक्षय परदेशी, केतन क्षीरसागर, भगवान घुगे व आबा देशमुख हे शुक्रवारी (दि़१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास विनापरवानगी कंपनीत घुसले़ त्यांनी गणपती मंडळासाठी अकरा हजार रुपयांची वर्गणीची मागणी करून न दिल्यास कंपनीत काम होऊ देणार नाही, बघून घेतो अशी धमकी दिली़या प्रकरणी वाघ यांच्या फिर्यादीवरून मंडळाच्या या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, गणेशोत्सवात कोणत्याही मंडळाच्या पदाधिकारी वा कार्यकर्ते यांना जबरदस्तीने वर्गणी मागता येणार नाही़ अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील असे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगीतले होते़