शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकलाही मधाचे बोट?

By admin | Updated: January 22, 2017 00:24 IST

डीसी रुल : सप्ताहात प्रसिद्धीची शक्यता

नाशिक : राज्य शासनाने पुणे शहराची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करताना एफएसआयची खैरात करताना वादग्रस्त बीडीपी झोन व हिलटॉप हिल्सच्या बांधकामाचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे, नाशिकचीही नियमावली जाहीर करताना पुण्याप्रमाणेच ‘एफएसआय’बाबत मधाचे बोट लावले जाण्याची शक्यता असून, ‘कपाट’चा वादग्रस्त मुद्दा मात्र प्रलंबित राहणार असल्याची चर्चा आहे.  राज्यात नाशिकप्रमाणेच पुणे महापालिकेचीही निवडणूक होत आहे. त्यामुळे, राज्य शासनाने नाशिकसह पुण्याचा विकास आराखडा दि. ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध करताना आराखड्याचाच अविभाज्य भाग असलेल्या विकास नियंत्रण नियमावली मात्र प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे नाशिकचा ६ व ७.५० मीटर रस्त्यावरील टीडीआर आणि बहुचर्चित ‘कपाट’चा प्रश्न रेंगाळला. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मतदारांवर प्रभाव टाकणारी नियमावली राज्य शासनाकडून प्रसिद्ध केली जाणार नाही, असे सांगितले जात असतानाच राज्य शासनाने गुरुवारी अचानक पुणे शहराची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली आणि त्यात एफएसआयची खैरात केली. त्यामुळे पुणेपाठोपाठ नाशिकचीही विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याची अपेक्षा वाढली आहे. मात्र, ही नियमावली प्रसिद्ध करताना काही प्रमाणात दिलासा देणारे निर्णय घेऊन मधाचे बोट लावले जाण्याची शक्यता असून, ‘कपाट’सह टीडीआरचा मुद्दा प्रलंबित ठेवला जाणार असल्याची चर्चा आहे.  दरम्यान, पुढील सप्ताहात नाशिकची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (प्रतिनिधी)