शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक साखर कारखाना विक्रीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 16:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू असल्याने बँकेने त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले होते. या ना हरकत प्रमाणपत्रामुळे लिलाव प्रक्रि या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू असल्याने बँकेने त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले होते. या ना हरकत प्रमाणपत्रामुळे लिलाव प्रक्रि या राबविण्यास अडथळा येत होता. अखेर जिल्हा बँकेने नासाका दिलेला ना हरकत प्रमाणपत्राचा दाखलादेखील गुरुवारी रद्द केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नासाका विक्र ीचा मार्ग खुला झाला आहे.नासाका कारखान्यांकडे ९७ कोटी, तर निफाड कारखान्यांकडे १२५ अशी एकूण २३२ कोटींची थकबाकी जिल्हा बँकेकडे आहे. अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राजेंद्र बकाल यांनी जप्त केलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्यांचे लिलाव करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बँकेने या दोन्ही कारखान्यांचे लिलाव करण्याची प्रक्रि येस सुरुवात करत, त्यासाठी पुण्यातील मिटकॉन कंपनीला मूल्य निर्धारित करण्याचा कंत्राट दिले होते. मिटकॉनने दोन्ही कारखान्यांचे मूल्य काढून आपला अहवाल सादर केला होता. या अहवाल ३१ जुलै झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात ठेवून कारखाने लिलावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला होता. यास संचालक मंडळाने मंजुरी देत लिलाव प्रक्रि येसदेखील संचालकांनी मंजुरी दिली होती. याच दरम्यान, नासाका पुन्हा सुरू करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंबईत बैठक झाली. या बैठकीत नासाकाला शासकीय हमी देण्यास सरकारने नकार देत प्रशासकीय मंडळाने वैयक्तिक हमीवर कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे नासाका सुरू करण्याची चिन्हे होती. त्यासाठी जिल्हा बँकेची एनओसीदेखील मिळविली होती. बँकेने दिलेल्या या एनओसीमुळे नासाका लिलाव प्रक्रि येत अडथळा निर्माण झालेला होता. मात्र, नासाका सुरू होण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने गुरुवारी (दि.१०) जिल्हा बँकेने नासाकाला दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द केली असल्याचे पत्र नासाका प्रशासकीय मंडळाला दिले. त्यामुळे ही ना हरकत प्रमाणपत्र रद्द झाल्याने आता नासाका विक्र ीचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच पुढील प्रक्रि या सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.