शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त अभियानात नाशिक यशस्वी

By admin | Updated: May 8, 2017 01:46 IST

नाशिक : दहावी व बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत क ॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत क ॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षी बारावी परीक्षेत नाशिकमधून १३८ व दहावीत १९७ कॉपीची प्रकरणे समोर आली होती, तर यावर्षी बारावीत केवळ ९४ व दहावीत १०८ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याने कॉपीमुक्त अभियान नाशिक विभागातून यशस्वी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.नाशिक विभागातील ६५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी, तर ७३,०२७ कला व वाणिज्य शाखेच्या २२,३९७ अशा एकूण एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्ह्यांतील ९५२ महाविद्यालयांतील २१८ केंद्रांवर यावर्षी बारावीची परीक्षा दिली, तर दहावीच्या परीक्षेला विभागातील एकूण २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी ४१७ केंद्रांच्या माध्यमातून सामोरे गेले. या परीक्षांतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाच्या नऊ भरारी पथकांची यंदा परीक्षांवर करडी नजर होती. यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने बारावीचे नाशिकमधून २७, जळगावला २०, धुळे ४७ व नंदुरबारमध्ये केवळ एक असे विभागातून एकूण ९४ विद्यार्थ्यांना कॉपीच्या प्रकरणात पकडले गेले, तर दहावीचे नशिकमधून २५, धुळे ३७, जळगाव ४६ व नंदुरबारमधून शून्य कॉपीची प्रकरणे आढळली. गेला वर्षाच्या तुलनेत बारावीत हा आकडा ३८, तर दहावीत ८९ ने कमी आहे. गेल्या वर्षात मार्च २०१६ च्या बारावी परीक्षेत नाशिकमधून ५३, धुळे जिल्ह्यातून २२, जळगावमधून ५१ व नंदुरबारमधून ६ असे एकूण १३८, तर दहावीच्या परीक्षेत नाशिकमधून १०९, धुळे २१, जळगाव ५३ व धुळे १४ क ॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाने कारवाई केली होती. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले असून, कॉपीमुक्त अभिनाच्या दृष्टीने नाशिक शिक्षण मंडळाचीही यशस्वी वाटचाल असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.