शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानक : सरकता जिना पडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:12 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची तोडफोड केल्याने सरकता जिना उद्घाटनानंतर दीड दिवस बंद पडला होता. काही उपद्रवींकडून सरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन या ठिकाणी छेडछाड करत असल्याने त्यांच्यावर रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची तोडफोड केल्याने सरकता जिना उद्घाटनानंतर दीड दिवस बंद पडला होता. काही उपद्रवींकडून सरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन या ठिकाणी छेडछाड करत असल्याने त्यांच्यावर रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.  नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलीस ठाण्यालगत प्लॅटफॉर्म एकवरून पादचारी पुलावर जाण्यासाठी सरकता जिना (एक्सेलेटर) बसविण्यात आला असून, शनिवारी त्याचे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी दिवसभर सरकता जिना व्यवस्थित सुरू होता. मात्र सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याने सरकता जिना सोमवारी दुपारपर्यंत बंद पडला होता. रेल्वेचे अभियंता प्रवीण पाटील यांनी सरकत्या जिन्याचे ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून रविवारी सकाळपासून तपासणी करून दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी दुपारी सरकता जिना पूर्ववत सुरू झाला.  रेल्वेस्थानकावर सरकता जिना सुरू झाल्यानंतर लहान मुले, मुली, युवक, नागरिक, महिला सहज फिरायचे म्हणून त्या सरकत्या जिन्यावरून ये-जा करत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून त्या सरकत्या जिन्याकडे तिकीट तपासणीसला उभे करण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्यांच्याजवळ तिकीट, आरक्षण आहे त्यांनाच सरकत्या जिन्यावरून ये-जा करून देणार आहे. प्लॅटफॉर्मवर दोन ठिकाणी बसविलेल्या लिफ्टमध्येदेखील नुकसान करून अस्वच्छता केली आहे, तर पिण्याच्या पाण्याच्या वॉटर वेडिंग मशीनशी सतत छेडछाड केली जात असल्याने त्या मशीनचा बंद-चालूचा खेळ सुरू आहे. काही उपद्रवींमुळे या सोयी-सुविधांपासून प्रवाशांना वंचित राहावे लागते.कठोर कारवाईची गरजसरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन येथे छेडछाड करून उपद्रव करणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विनाकारण फुकट सरकता जिन्यांचा वापर करणाºयांना खाकीचा हिसका दाखविण्याची गरज आहे. प्रवाशांसाठी असलेल्यासोयी-सुविधांना खराब व अस्वच्छता करणाºयांवर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे