शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

नाशिकरोड कारागृहातील कर्मचाऱ्यांना टिप्परच्या म्होरक्याकडून मारहाण

By admin | Updated: January 23, 2017 00:31 IST

कारागृहातील प्रकार : रेडिओ चॅनल बदलण्यावरून वाद; गुन्हा दाखल

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रेडिओचे चॅनल बदलण्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांना सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगचा म्होरक्या व त्याच्या मोठ्या भावाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी टिप्पर गँगच्या पठाण बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्काच्या आरोपाखाली सिडकोतील टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण व त्याचा मोठा भाऊ शाकिर नासिर पठाण ऊर्फ मोठा पठाण हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत़ शनिवारी (दि़२१) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेडिओचा चॅनल बदलण्याच्या कारणावरून समीर नासीर पठाण, शाकिर नासिर पठाण व बंदी तुकाराम गोडसे यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली़  कैद्यांमध्ये वाद व हाणामारी सुरू झाल्याने कारागृहातील कर्मचारी शिपाई बिसमिल्ला शब्बीर तडवी व इतर सहकारी हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडले़ या कर्मचाऱ्यांना पठाण बंधूंनी शिवीगाळ व मारहाण केली़ या प्रकरणी पठाण बंधूंविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)