शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

नाशिकरोडला ‘उत्सव’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:46 IST

नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती.

नाशिकरोड : नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळेच येथील गणेशोत्सवदेखील तितका भव्य आणि नागरिकांना आकर्षित करणारा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाची भव्यता कमी झाली असून, बोटावर मोजण्याइतपतच मंडळांच्या बळावर गणेशोत्सवाची परंपरा टिकून आहे.अनेकविध कारणांमुळे उत्सवातील भव्यता कमी झाली असून, लोकसहभागही कमी झाला आहे. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय कारणेदेखील यामागे असल्याचे सांगितले जात असले तरी परंपरागत सण-उत्सवासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणारे कार्यकर्ते, नेतेच नसल्याने नाशिकरोडचा सांस्कृतिक वारसा कमी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे इंदिरानगरसारख्या भागात सांस्कृतिक चळवळ रुजत असताना जवळच्या नाशिकरोडमधून मात्र उत्सवाचे महत्त्वच कमी झाल्याचे चित्र आहे.नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास हद्दपार झाल्यासारखाच आहे. बोटावर मोजण्याइतपत पाच ते सात मंडळांनी ही परंपरा कशीबशी टिकवून धरली आहे. अंतर्गत राजकारण, नियम आणि कायद्याचा अडसर, पोलिसांची दंडुकेशाही घटलेली वर्गणी, आर्थिक अडचणी, लोकांचा कमी झालेला सहभाग या सर्वांचा परिणाम या उत्सवावर दिसून येत आहे.साधारणपणे दोन दशकांपूर्वी नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख होती. मंडळांमध्ये भव्यतेची स्पर्धा होती. धुमधडाक्यात उत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सवाची संख्या मोठी होती. परंतु कालांतराने या उत्सवाला घरघर लागली. अनेक विविध घटनांमुळे मंडळांची संख्या कमी होत गेली.उत्सवाला सार्वजनिक स्वरूप यावेसार्वजनिक उत्सवातून कमी होणारे कार्यकर्ते, नेत्यांचे झालेले दुर्लक्ष, पोलीस प्रशासनाचे नियम, महागडे देखावे, या कारणांमुळे उत्सवाला अधिकच उतरती कळा आली आहे. लोकांचा सहभाग आणि सार्वजनिक हितासाठी नेते, कार्यकर्त्यांनी उत्सव अधिक लोकाभिमुख केला तर सर्वसामान्यांचाही सहभाग वाढू शकतो.कार्यकर्त्यांचा राजकारणातील सक्रिय सहभाग वाढत गेला आणि सामाजिक सण उत्सवाची नाळ तुटत गेली. राजकारण आणि स्वहिताला महत्त्व प्राप्त झाल्याने सार्वजनिक मंडळे हळूहळू कमी झाली. ज्यांची इच्छा आहे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. निवडणुकीचा ज्वर वाढला तर उत्सवाला बहर येतो. इतरवेळी मात्र कुणीही मदतीला पुढे येत नसल्याचा अनुभव जुन्या कार्यकर्त्यांना येत आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिकNashik Floodनाशिक पूर