शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड प्रभागसभेमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:24 IST

प्रभाग समितीच्या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याबाबत त्यांना नोटीस बजविण्यात यावी. बंद पथदीपावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.

नाशिकरोड : प्रभाग समितीच्या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याबाबत त्यांना नोटीस बजविण्यात यावी. बंद पथदीपावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.  नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक सोमवारी दुपारी प्रभाग सभापती अनिता सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला विविध विभागांचे १६ पैकी फक्त तीन विभागप्रमुख उपस्थित होते. यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत आम्ही कामे कोणाला सांगायची, निर्णय घेणारे, प्रस्ताव तयार करणारे अधिकारी उपस्थित राहत नसतील तर जनतेची कामे कशी होणार, नागरिकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात, असे स्पष्ट केले. आजारी असल्याचे व बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे पहिलेच अधिकारी कळवत असतील तर प्रभागाच्या बैठकीचा फायदा काय? असा प्रश्न विचारून अनुपस्थित असलेल्या अधिकाºयांना नोटीस बजविण्यात यावी. यापुढील बैठकीला सर्व अधिकारी कोणतेही कारण न देता उपस्थित राहिले पाहिजे, अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली.  नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी पथदीप बंद असून, तक्रारी करूनसुद्धा पथदीप सुरू होत नाही. जुने धोकादायक गंजलेले विद्युत पोल बदलत नाही. अशा विद्युत विभागाच्या कामांवरून चांगलीच खडाजंगी झाली. विद्युत साहित्य नसल्याचे सांगून संबंधित अधिकारी टोलवाटोलवी करतात, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. बैठकीला नगरसेवक सुनीता कोठुळे, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, डॉ. सीमा ताजणे, मीरा हांडगे, संगीता गायकवाड, सरोज आहिरे, रंजना बोराडे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, पंडित आवारे, शरद मोरे, संतोष साळवे, केशव पोरजे, विशाल संगमनेरे, अंबादास पगारे व अधिकारी उपस्थित होते.