शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड : कार्यालयातच देवाण-घेवाण; वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र प्रकरणाकडे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:02 IST

शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये

ठळक मुद्दे पदभार देऊन वरिष्ठांनी उपकृत केलेचलन पास करण्यासाठी चिरीमिरी स्पष्ट कारवाई शक्यतेविषयी साशंकता

नाशिक : शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडेउघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये होत असून, या साºया प्रकाराबाबत मात्र वरिष्ठ अधिकाºयांनीही सोयीस्कर काणाडोळा केल्याने त्यांचीच यामागे फूस असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालयीन अधीक्षकाने आजवरचा सेवा कालावधी पुरवठा खात्याच्या चरणीच घातल्यामुळे की काय मर्जी म्हणून त्यांच्याकडे पुरवठा निरीक्षकाचा अतिरिक्त पदभार देऊन वरिष्ठांनी उपकृत केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक वर सदरची चित्रफीत व्हायरल झाल्याने पुरवठा खात्यात सारेच आलबेल आहे असे नसून आजवर केल्या जाणाºया पुरवठा खात्यातील भ्रष्टाचारावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. रेशन दुकानदारांकडून नागरिकांचे आधारकार्ड गोळा करून त्याची संगणकात नोंद करण्याचे काम पुरवठा खात्याकडून केले जात आहे. सदर काम ठेकेदाराकरवी व पुरवठा खात्याच्या निधीतून केले जाणार असले तरी, या कामासाठी संबंधित दुकानदारांनी पैसे द्यावेत, असा आग्रह पुरवठा खात्याकडून धरला जात आहे. याचाच संदर्भ या चित्रफितीत आहे तसेच चलन पास करण्यासाठी द्यावी लागणारी चिरीमिरीदेखील त्यातून स्पष्ट झाली आहे. शहर धान्य वितरण कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक असलेले शेख यांच्याविषयी यापूर्वीही तक्रारी झाल्या असून, त्यांच्या विरोधात यापूर्वी काही दुकानदारांनी उपोषणास्त्र उगारूनही त्याला पाठीशी घालण्यात आल्याने आत्ताही चित्रफीत व्हायरल होऊनही शेख याच्यावर कारवाई होण्याच्या शक्यतेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.