शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला कडकडीत बंद

By admin | Updated: November 6, 2014 00:22 IST

जवखेडे हत्त्याकांड घटनेचा निषेध मोर्चा; विविध संघटनांचा सहभाग

नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्त्याकांडाच्या निषेधार्थ नाशिकरोडला कडकडीत बंद पाळण्यात येऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.जवखेडे येथील जाधव कुुटुंबीयांच्या निर्घृण हत्त्याकांडाच्या निषेधार्थ व अद्यापही आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ जातीय अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आली होती. यामुळे सकाळपासून अनेक व्यापारी आपली दुकाने न उघडता बंदमध्ये सहभागी झाले होते. यामुळे नाशिकरोडची बाजारपेठ व रस्त्यावरील गर्दीदेखील नेहमीपेक्षा अत्यंत कमी होती. अनेक भागांत तर सामसूम पसरलेली होती.जेलरोड, भीमनगर येथून सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृती समितीच्या वतीने शासन, पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा बिटको चौकात दाखल झाल्यानंतर विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते, भाजीपाला विक्रेते मोर्चात सहभागी झाले. बिटको चौकातून मोर्चा शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, सत्कार पॉर्इंट, मुक्तिधाममार्गे बिटको चौकापर्यंत काढण्यात आला. निषेध मोर्चाच्या आवाहनामुळे सर्वांनीच आपले व्यवहार, व्यवसाय बंद करून घेतल्याने सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. बिटको चौकात मोर्चाच्या समाप्तीनंतर झालेल्या चौकसभेत माजी नगरसेवक गणेश उन्हवणे, दीपक नन्नावरे, शशिकांत उन्हवणे यांनी जाधव हत्त्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, तसेच तपासामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली.यावेळी फकिरा जगताप, हिरामण वानखेडे, रामभाऊ जगताप, आकाश भालेराव, अनिल गांगुर्डे, दिनेश निकाळजे, देवीदास डोखे आदिंसह विविध पक्ष, संघटना, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)