शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन बसच्या धडकेत १८ जखमी नाशिकरोड : बिटको चौकातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:16 IST

नाशिकरोड : बिटको चौक सिग्नलवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर पाठीमागुन सटाणा-नाशिक-पुणे बस जाऊन आदळल्याने १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला डोक्यास जास्त मार लागला आहे.

ठळक मुद्दे ब्रेक मारून बस थांबवावी लागलीजखमी प्रवाशांवर तातडीने प्राथमिक उपचार

नाशिकरोड : बिटको चौक सिग्नलवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर पाठीमागुन सटाणा-नाशिक-पुणे बस जाऊन आदळल्याने १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला डोक्यास जास्त मार लागला आहे.बसचालक नामदेव भागुजी शेळके हे गुरुवारी सकाळी ९ वाजता एसटी महामंडळाची शिवशाही बस (एमएच ०६-३३२) ही प्रवासी घेऊन नाशिकवरून पुण्यास जाण्यास निघाली. नाशिकरोड दत्तमंदिर सिग्नल ओलांडून बिटको चौकाकडे शिवशाही बस जात असताना अचानक पुढे एका रिक्षाचालकाने रस्त्यातच रिक्षा उभी केल्याने शिवशाही बसचालकाने रिक्षा मागे बस उभी केली. त्यामळे पाठीमागून येणारी एसटी महामंडळाची सटाणा-नाशिक-पुणे बस (एमएच १४ बीटी ४५१९) चालकाला अचानक ब्रेक मारून बस थांबवावी लागली. मात्र यामध्ये सटाणा-पुणे बस ही शिवशाही बसवर पाठीमागून जाऊन आदळली. सटाणा-पुणे बस चालकाने अचानक जोरदार ब्रेक मारल्याने बसमधील सीटवर बसलेले प्रवासी पुढील सीटवर आदळल्याने पाच वर्षांची आराध्या अमोल मुंदवालकर हिच्या डोक्याला दुखापत होऊन ती जास्त जखमी झाली. जखमी प्रवाशांवर तातडीने प्राथमिक उपचार केल्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.प्रवासी संध्या दिगंबर भामरे, अश्विनी धोंडीराम खैरनार, रामदास दीनानाथ बोडके, रोशनी अभिजित गायकवाड, चित्रा प्रमोद सुलेनकर, विजया राजेंद्र पाटील, संजय रामलखन होडेकर, मंगल शंकर ठाकरे, नंदा बाळकृष्ण गायकवाड, पूनम संदीप भांगरे, शंकर पंढरीनाथ बकरे, लतिफा शेख युसूफ, हसन शेख उस्मान, शहीदा शेख हुसेन, अब्दुल रहेमान शेख युसूफ, शैला प्रकाश पवार, सुमनबाई आनंदा खरात यांच्या डोक्याला, हनवटीला, गुडघ्याला आदी ठिकाणी दुखापत झाल्याने जखमी १८ प्रवाशांना त्वरित बिटको रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.