नाशिक : राग मुलतानीतील बडा ख्याल तथा ताल विलंबित एकतालातील ‘बंदिश गोकुल के छोरा’ द्रुत तीन तालातील ‘मानत जियरा मोरा तुमीसन’ आदी बंदिशींच्या शास्त्रीय संगीत रचनांनी रंगलेल्या अखंड ख्याल संकीर्तनात नाशिककर रसिक दंग झाले. कुसुमाग्रज स्मारक येथील ‘कुसुमाग्रस स्मरण’ सोहळ्यात रविवारी संध्याकाळी अखंड ख्याल संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या ख्याल संकीर्तन सोहळ्यात शोभा भडकरमकर यांनी राग मारू बिहाग सादर केला, तर जाई कुलकर्णी यांनी पुरिया धनश्री राग सादर करताना रसिकांची दाद मिळवली. प्रितम नकील यांनी राग श्याम कल्याण सादर केला. दीपक घारपूरकर यांनी रांगेश्री, आशिष रानडे यांनी राग मुलतानी, रागेश्री वैरागकर यांनी सरस्वती, आनंद अत्रे यांनी जोग, सुखदा दीक्षित यांनी भीमपलास, अविराज तायडे यांनी सोहनी व शंकर वैरागकर राग अभोगी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना नितीन पवार, नितीन वारे, सुजित काळे, गौरव तांबे, आनंद अत्रे, हर्षद वडजे, प्रसाद गोखले, रसिक कुलकर्णी, बल्लाळ चव्हाण, अनिल दैठणकर, सागर कुलकर्णी व पंडित सुभाष दसककर यांनी साथसंगत केली.
अखंड ख्याल संकीर्तनात नाशिककर दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:14 IST