शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:41 IST

शहराचे तपमान मागील दहा दिवसांपूर्वी चाळिशीच्या पुढे गेल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून तपमान पुन्हा कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले होते; मात्र मंगळवारी कमाल तपमान ३९ अंश इतके नोंदविले गेले.

नाशिक : शहराचे तपमान मागील दहा दिवसांपूर्वी चाळिशीच्या पुढे गेल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून तपमान पुन्हा कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले होते; मात्र मंगळवारी कमाल तपमान ३९ अंश इतके नोंदविले गेले.  पंधरवड्यानंतर शहर कमालीचे तापत असून, वाढत्या उष्म्याने नाशिककर हैराण झाले आहेत. शहराच्या तपमानाचा पारा पुन्हा चाळिशीकडे सरकू लागल्याचे दिसत आहे. यावर्षी नाशिककरांना कडक उन्हाळा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये अधिक उष्णता जाणवत आहे. मंगळवारी सकाळपासून प्रखर ऊन जाणवत होते. त्यामुळे वातावरणात उष्माही प्रचंड वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाल्याने घामाघूम झाले. वाऱ्याचा वेगही प्रचंड मंदावला होता. शहरातील रस्ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दिसून आला. सूर्यास्तानंतर नाशिककर थंड वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गोदाकाठावर तसेच गोदापार्क व शहरातील उद्यानांच्या दिशेने वळाले. शाळांना सुटी लागल्याने संध्याकाळी शहरातील काही उद्याने गजबजलेली होती.बर्फापासून व्हा सावध !उन्हाच्या तीव्रतेमुळे जिवाची काहिली होत असल्यामुळे नाशिककर दिलासा मिळविण्यासाठी शीतपेयं व बर्फाचा वापर असलेले थंड पदार्थ सेवन करताना दिसून येत आहेत; मात्र बफर् ामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. कारण बर्फाची शुद्धता व दर्जाबाबत साशंकता आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकू न राहावे यासाठी भरपूर पाणी प्यावे; मात्र उन्हामधून आल्यास तत्काळ फ्रिज किंवा माठामधील पाणी पिणे टाळावे. काही वेळ घरात बसल्यानंतर पाणी प्यावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच जास्तवेळ बाजारात खरेदीसाठी फिरत असताना उसाचा रस किंवा अन्य प्रकारच्या फ ळांचा रस पिणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टर देत आहेत.

टॅग्स :Temperatureतापमान