शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण

By admin | Updated: May 20, 2017 00:43 IST

नायगाव : प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामास पुन्हा प्रारंभ झाला आहे

दत्ता दिघोळे । लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामास पुन्हा प्रारंभ झाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे घोंगडे भिजत पडले असून, पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. सदर सर्वेक्षण अंतिम असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांकडून केला जात असून, त्यानंतर लोहमार्गाच्या पुढील कामास वेग येणार आहे. नाशिक-पुणे या २६६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सध्या सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात हे काम सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून जायगाव, वडझिरे शिवारात सर्व्हे करण्यात येत आहे. यासाठी दोन पथके नेमण्यात आली असून, पहिले पथक लाइनआउट करून निशाण्या करत आहे, तर दुसरे पथक निशाणी केलेल्या ठिकाणाहून २५ मीटरचा सर्व्हे करून दिशा ठरवत आहेत. प्रस्तावित नाशिक-पुणे लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पुणे येथील कोथरुडच्या मे. हायड्रोपनियम सिस्टीम या कंपनीकडे असल्याचे समजते. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. या लोहमार्गासाठी यापूर्वी दोन ते वेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र सर्वेक्षणानंतर कोणत्याही हालचाली न झाल्याने दहा वर्षांपासून या प्रकल्पाची गाडी सर्वेक्षणाच्या स्थानकावरच थांबून असल्याचे चित्र होते. नाशिक व पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा जवळचा मार्ग ठरणार आहे. यातील ६२ किलोमीटर अंतर नाशिक जिल्ह्यातून जात आहे, तर ५९ किमी शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. बाकीचा १४५ किमीचा रेल्वेमार्ग पुणे जिल्ह्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वेक्षणाचे काम करण्यात आले होते. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा, बोटा परिसरात सर्वेक्षणाचे काम झाले आहे. पुन्हा नव्याने सर्वेक्षणनाशिक आणि पुणे ही दोन्ही शहरे जवळच्या लोहमार्गाने जोडण्यासाठी नवा लोहमार्ग तयार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विषय घेतला जातो. मागील पाच रेल्वेमंत्र्यांनी हा विषय रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केला होता. सद्यस्थितीतल्या नव्या मार्गासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नाशिकहून पुण्याला रेल्वेने जाण्यासाठी कल्याण, पनवेल व कर्जतमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ व जास्त खर्च होतो. त्यातून सध्याच्या रेल्वेसेवेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व्हेनुसार हा रेल्वेमार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, आळे फाटा, राजगुरुनगर असा असणार आहे.