शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पोलिसांनी रोखला परप्रांतीय मजुरांचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:13 IST

शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकोरोनामुळे बेघर मजुरांचे स्थलांतर बेरोजगारीमुळे निवडला परतण्याचा पर्यायगावाच्या ओढीने मजल दरमजल पायी प्रवास

नाशिक : बिऱ्हाड डोक्यावर घेऊन कच्च्याबच्यांसह आपले मूळ गाव गाठण्यासाठी लॉकडाउन काळातसुद्धा परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. अशाचप्रकारे शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने गुरुवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये रोजगार बुडाला आहे. सरकारकडून जरी मजुरांची निवास, भोजनाची हमी घेतली जात असली तरीदेखील मजुरांना आपल्या मूळ घराची लागलेली ओढ शांत बसू देत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. नाशिकमध्ये यापूर्वीही मोठ्या संख्येने अशा मजुरांना रोखले गेले आहे. मुंबईनाका भागातील उड्डाण पुलावर यातील सुमारे शंभर नागरिकांना पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले. अचानक उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे धाव घेतली. महिला, पुरुष आणि मुले त्यांना दिसून आली. या सर्वांना सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत उड्डाणपुलावर पोलिसांनी रोखले. या नागरिकांकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात या नागरिकांनी आपले मूळ गाव उत्तर भारतात असल्याचे सांगितले. यात काही महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. राज्य सरकारच्या आदेशानुसार या नागरिकांचा प्रवास पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या सर्व नागरिकांची रवानगी गंगापूररोडवरील आनंदवली भागातील महापालिकेच्या शेल्टर होममध्ये केली आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जेवणाची सोयही  प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आतापर्यंत आठशेपेक्षा अधिक पायी व वाहनातून अनधिकृ त प्रवास करणाऱ्या नागरिकांना पकडण्यात आले आहे. या नागरिकांना वेगवेगळ्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या नागरिकांपैकी एक करोनाग्रस्त आढळून आला आहे. दररोज शेकडो नागरिक मजल दरमजल करत कित्येक मैल अंतर रणरणत्या उन्हात आपला जीव धोक्यात घालत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक