शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आता ‘पूर पर्यटन’

By admin | Updated: August 4, 2016 01:33 IST

दौरे सुरू : राज यांच्या पाठोपाठ अन्य पक्षांचे नेतेही येणार

 नाशिक : शहरात बुधवारी येऊन गेलेल्या महापुरानंतर आता पावसाचा जोर ओसरला असतानाच नाशिकमध्ये मात्र अभ्यागत नेत्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांपाठोपाठ नाशिकचे पालकत्व स्वीकारल्याचा दावा करणाऱ्या राज ठाकरे यांनीदेखील पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच येत्या काही दिवसात अन्य पक्षांच्या वतीने आपापल्या नेत्यांना आणण्याची तयारी सुरू झाली आहे.शहरात २००८ मध्ये महापुराच्या वेळी असाच अनुभव आला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर पूर पर्यटन बनले होते. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भागात भेटी देऊन पाहणी दौरे केले तसेच पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासन आणि अन्य यंत्रणांकडे धाव घेतली होती. पूर कृत्रिम होता की नैसर्गिक तसेच शहरातील हरवलेली पूररेषा हा विषय राजकारणी मंडळींना आयताच मिळाला होता. त्यावरून सह्यांची मोहीम राबविणे आणि पूररेषेत बांधकामांना परवानगी मिळविणे असे प्रकार सुरू होते, आताही अशाच प्रकारे हा विषय राजकीय पटलावर येण्याची शक्यता आहे. मंगळवारी आल्यानंतर एरव्ही गायब असल्याची टीका असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तातडीने नाशिकमध्ये डेरेदाखल झाले. त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांच्या समवेत आपापल्या मतदार संघांचा संबंध नसलेल्या अनेकांनी पाहणी दौरे केले. बुधवारी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि त्या त्या भागातील राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झाले आहेत. मंगळवारी पूर परिस्थितीच्या वेळी उपलब्ध न झालेले अनेक नगरसेवक बुधवारी नागरिकांना उपलब्ध झाले आहे आणि त्यानिमित्ताने पूर पर्यटन सुरू झाले.