शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नेट झीरो कार्बनसाठी नाशिक महापालिकेने घेतला जागतिक मोहिमेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्बन न्यूट्रल करण्यासाठी नाशिक शहराच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या मे ...

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्बन न्यूट्रल करण्यासाठी नाशिक शहराच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या मे महिन्यातच डिजिटल स्वाक्षरी केली होती. आता नाशिक प्रत्यक्ष दस्तावेजांवर आयुक्तांनी सही केली आहेे. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात देशपातळीवर नाशिकचा क्रमांक अत्यंत वरचा आहे; मात्र गेल्या काही वर्षात वाढते शहरीकरण आणि त्यापाठोपाठ आलेल्या समस्यांनी प्रदूषण देखील वाढले आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅममध्ये नाशिकचा समावेश करण्यात आला असून महापालिका त्यासाठी देखील वेगवेगळे उपक्रम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने राबवत आहे. अलीकडेच नाशिक महापालिकेला क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत वीस कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून त्या अंतर्गत नाशिक महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या चार अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसवण्याची कार्यवाही सुरु केली आहे. जेणेकरून लाकडाचा वापर कमी होईल. अशाच प्रकारे धुलीकण कमी करण्यास अन्य अनेक उपाय देखील केले जात आहेत.

नेट झीरो कार्बनसाठी नाशिक महापालिकेने तयारी केली आहे. नाशिक शहराला २०५० पर्यंत नेट झीरो करण्यासाठी संयुक्त राष्ट्र क्लायमेट चेंज अंतर्गत रेस टू झीरो अंतर्गत महापालिकेने भाग घेतला आहे. या अंतर्गत जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत अर्धे करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच वैयक्तिक पातळीवर २०५० पर्यंत नेट झीरो कार्बनचे उद्दिष्ट असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात या मोहिमेत सहभागी सदस्यांची ग्लासगो येथे बैठक हेाणार आहे.

इन्फो..

नाशिक महापालिकेने या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष कामे देखील सुरू केली असून स्मार्ट रोड तयार करतानाच सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर दिला आहे. शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बस सेवा सुरू करताना इलेक्ट्रिकल आणि सीएनजी बसला प्राधान्य दिले असून त्या माध्यमातून कार्बन फ्री वाहतुकीवर भर देण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेने अक्षय ऊर्जे अंतर्गत सौर ऊर्जेवर देखील भर दिला आहे.

इन्फो...

नाशिक महापालिकेचे उद्दिष्ट

- संपूर्ण शहरात अति महत्त्वाची आणि नागरिकांना आवश्यक असलेली वाहने अवघ्या पंधरा ते तीस मिनिटात गाठता येईल अशी अतिपरिचित क्षेत्रे विकसित केली जाणार आहेत.

- २०२५ पर्यंत झीरो कार्बन उत्सर्जन बस प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. म्हणजे महापालिकेच्या ताफ्यात सर्व पर्यावरण स्नेही बस असतील.

- २०३० पासून नेट झीरो कार्बन इमारती सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने रोडमॅप तयार करण्यात येणार आहे.

इन्फो...

नाशिक