शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक - मुंबई महामार्ग आढाव्याच्या बैठकीचीही कोंडी!

By संजय पाठक | Updated: July 9, 2024 18:07 IST

मुहूर्त लागेना: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक सलग दुसऱ्या दिवशीही रद्द

संजय पाठक, नाशिक: सध्या नाशिक- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी हा सर्व सामान्य नागरीकांच्या त्रासाचा विषय असून राज्य विधी मंडळाचे अधिवेशन असताना तीन आमदारांनी हा विषय मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊ असे जाहिर केले. प्रत्यक्षात सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस बैठक जाहिर करून ती रद्द करण्यात आली.

नाशिक- मुंबई महामार्गाची अवस्था बिकट झाली असून उद्योग व्यवसायिकांबरोबर उच्च न्यायालय किंवा रूग्णालयात जाणारे येणारे नागरीक सरकारी अधिकारी सारेच वैतागले आहेत.  यासंदर्भात वाहतूक केांडीत अडकलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले, त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी हा विषय मांडला. त्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी तर मुंबईहून लंडनला जाणे सोपे, पण नाशिकला जाणे कठीण अशी टीकाही केली.

दरम्यान, सोमवारी (दि.८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी दहा वाजता मंत्रालयात बैठक बोलावली होती.  मात्र, सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने ही बैठक रद्द झाली. त्यानंतर ही बैठक मंगळवारी (दि.९) होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मंगळवारी देखील ही बैठक होऊ शकली नाही. या बैठकीला मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग