शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापौर निधी हायकोर्टाने गोठवला

By admin | Updated: October 30, 2014 22:38 IST

नाशिक महापौर निधी हायकोर्टाने गोठवला

मुंबई : नाशिक महापौर निधीचे सर्व व्यवहार गोठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रशासानाला दिले़ याआधी न्यायालयाने पुणे महापौर निधीचे व्यवहार गोठवण्याचे आदेश दिले आहेत़सोलापूर, ठाणे व उल्हासनगर महापालिका निधीचा सविस्तर तपशील न्यायालयासमोर ठेवणार आहेत़ त्यात गैरप्रकार आढळल्यास तेथील महापौर निधीही न्यायालयाकडून गोठवले जातील़ महापौरांच्या नावे निधी गोळा करण्याचे अधिकार कोणालाच नाहीत़ तसे करायचे असल्यास त्याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे करणे बंधनकारक आहे़ मात्र वरील कोणत्याच महापौर निधीची नोंद नाही आणि त्याद्वारे पैसे गोळा करून खर्च केले जात आहेत़ हे बेकायदा असून या निधीद्वारे सुरू असलेले सर्व व्यवहार गोठवावेत़ तसेच आतापर्यंत या माध्यमातून खर्च झालेले पैसे संबंधितांकडून वसुल करावेत, अशी मागणी करणारी याचिका महेंद्र धावडे यांनी अ‍ॅड़ एस़ एस़ पटवर्धन यांनी दाखल केली आहे़ पुणे पालिकेत हा निधी धर्मादाय आयुक्तांकडे कोणतीही नोंद करता वापरत असल्याचे स्पष्ट झाले़ त्यापाठोपाठ गुरूवारी नाशिक पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून अशाच प्रकारची कबुली दिली़ अमरावती पालिकेने हा निधी २०१० मध्ये बंद केल्याचे स्पष्ट केले़ प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)