शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात नाशिक राज्यात अव्वल क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 20:07 IST

नाशिक जिल्ह्याने राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर लसीकरणाचे काम केले. त्यानंतर दुसºया क्रमांकावर सातारा, त्यानंतर सोलापूर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

ठळक मुद्देसातारा, सोलापूर मागे : आणखी तीन महिने मोहीम चालणारजिल्ह्यात १११ टक्के लसी करणाचे काम झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आरोग्य खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेत वंचित राहिलेल्या राज्यातील गरोदर माता व बालकांसाठी दि. २ ते ९ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या मिशन इंद्रधनुष्य दोन योजनेत नाशिक जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. वंचित राहिलेले बालक व मातांना ११ टक्के लसीकरणाचे काम करून सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांना मागे टाकले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये २ ते ९ डिसेंबर दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांचे मार्गदर्शनाखाली नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामीण भागात विषेश मिशन इंद्रधनुष्य २.० ही लसीकरण मोहिम राबविण्यात आल्या. त्यात नाशिक जिल्ह्याने राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर लसीकरणाचे काम केले. त्यानंतर दुसºया क्रमांकावर सातारा, त्यानंतर सोलापूर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील ४,२५३ बालकांपैकी ४,५५२ बालकांना वरील कालावधीमध्ये लस देण्यात आली. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या बालकांचाही समावेश असून, जिल्ह्यातील १४०३ गरोदर मातांपैकी हे १५३९ गरोदर मातांना लस देण्यात आली. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या ऊसतोड, वीटभट्टी, कामगार बांधकामाचे मजूर इत्यादी महिलांचा समावेश असून, जिल्ह्यात १११ टक्के लसी करणाचे काम झाले आहे. ही लसीकरण मोहीम पुढील तीन महिने राबविण्यात येणार असून, पुढील दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन पुढील सात दिवस चालणार आहे. त्यामध्ये सुटीचे दिवस वगळण्यात येऊन ही मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील या मोहिमेचे सर्व सनियंत्रण जिल्हास्तरावरील परिवेक्षक तसेच तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांनी केले तर गाव पातळीवरील आशा, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहाय्यीकांचा मोलाचा वाटा आहे. या कार्यक्रमाची प्रसिद्धी विविध माध्यमांचा वापर करून करण्यात आली असून, पुढील तीन महिने लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना या मोहीम काळामध्ये लसीकरण करून संरक्षित करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद