शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, दिंडोरीत मतदारांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 02:04 IST

नाशिक :  जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक मतदारसंघात सोमवारी अंदाजे ६२ टक्के मतदारांनी उत्स्फूर्तपणे हक्क बजावला. नाशिक मतदारसंघात अंदाजे ५४.५० ...

नाशिक :  जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक मतदारसंघात सोमवारी अंदाजे ६२ टक्के मतदारांनी उत्स्फूर्तपणे हक्क बजावला. नाशिक मतदारसंघात अंदाजे ५४.५० टक्के, तर दिंडोरी मतदारसंघात ६३.५० टक्के  मतदान झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची  शक्यता आहे.   गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही या वाढलेल्या टक्क्याचा धसका घेतला असून, प्रत्येक जण आपापल्यापरीने या वाढलेल्या टक्क्याचा अर्थ काढत आहे.दरम्यान, या निवडणुकीतही मतदानासाठी गेलेल्या मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याच्या, तर काहींना नावेच न सापडल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मतदान यंत्रे अचानक बंद पडल्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काही वेळातच ८७ यंत्रे बदलण्याची तत्परता यंत्रणेने दाखविल्यामुळे मतदानासाठी वेळ वाढवून देण्यात आली. ग्रामीण भागात सकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली, तर शहरी भागात सकाळी व दुपारनंतर मतदार बाहेर पडले. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेची असतानाही साडेपाच वाजेनंतर अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर धाव घेतल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रांवर सहा वाजेनंतरही मतदान सुरू होते.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या अनुक्रमे १९०७ व १८८४ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली. मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मॉकपोल (मतदानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक) घेण्यात आले. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात १६ बॅलेट युनिट व १४ कंट्रोल युनिट त्याचबरोबर १८ व्हीव्हीपॅट बंद पडल्याचे निदर्शनास आले, तर दिंडोरी मतदारसंघात ७ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व १६ व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडली. यंत्रे बंद पडल्याचे पाहून काही केंद्रावरील अधिकाऱ्यांना घाम फुटला, तर काहींनी तत्काळ सेक्टर अधिकाºयाशी संपर्क साधून यंत्रे बंद पडल्याची माहिती दिली. अवघ्या काही वेळातच बंद पडलेली यंत्रे बदलण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी सकाळी ७ च्या ठोक्याला मतदान सुरू होऊ शकले नाही. मात्र यंत्राच्या या गोंधळामुळे सकाळी सर्व प्रथम मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ ताटकळावे लागले. अन्यत्र मतदान केंद्रावर मात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावण्यास सुरुवात केली. सकाळी सात ते नऊ या दोन तासांत नाशिक मतदारसंघात अवघ्या ६.६९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला, तर दिंडोरी मतदारसंघात ७.२८ टक्के मतदारांनी मतदान केले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांची उत्स्फूर्तता अधिक दिसून आली. अनेक मतदार केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यात वृद्धांसह पहिल्यांदाच मतदार करणाºया नवमतदारांचाही समावेश दिसून आला, तर शहरी भागात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सकाळी ९ वाजेनंतर मात्र मतदानाचा जोर काहीसा वाढला. अनेक नागरिकांनी सर्व तयारी करूनच मतदान केंद्र गाठले. सकाळी ११ वाजेपर्यंत दिंडोरी मतदार संघात २१.०६ टक्के तर नाशिक मतदारसंघात १७.२२ टक्के इतके मतदान नोंदविले गेले. मतदानाची वाढती टक्केवारी दुपारी १ वाजेपर्यंत कायम राहिली. दिंडोरी मतदारसंघात दुपारी १ वाजता ३५.५० टक्के, तर नाशिक मतदारसंघात ३०.५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यानंतर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत मतदानाचा वेग उन्हामुळे थंडावला. त्यानंतर पुन्हा ४ वाजेनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात ५८ टक्के, तर नाशिक मतदारसंघात ५३.५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला, तर सायंकाळी ६ वाजता मतदानाची वेळ संपल्यावरही मतदारांच्या रांगा कायम असल्याने प्रशासनाने अंदाजे टक्केवारी काढली असता त्यात दिंडोरीत ६३.५० टक्के, तर नाशिक मतदारसंघात ५४.५० टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मात्र अंतिम आकडेवारी मतदान यंत्रे स्ट्रॉँगरूममध्ये पोहोचल्यानंतरच स्पष्ट होणार असून, त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कर्मचाºयांचा जेवणामुळे  काही वेळ खोळंबालोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्णातील ४७२० मतदान केंद्रांवर सुमारे २४ हजार कर्मचारी, अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदानाच्या दिवशी या कर्मचाºयांच्या भोजनाची व्यवस्था करण्याऐवजी निवडणूक यंत्रणेने त्यांना भोजन भत्ता म्हणून प्रत्येकी दीडशे रुपये अदा करण्यात आलेले आहेत. या कर्मचारी, अधिकाºयांनी दुपारी १ ते ३ या वेळेत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी कमी झाल्यास मतदारांच्या सोयीचा विचार करून भोजन करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात सोमवारी सकाळी सहा वाजेपासून मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांनी दुपारी बारा वाजेनंतर आपापल्या सोयीने भोजन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रांगा लावून उभ्या असलेल्या मतदारांनी तक्रारी केल्या. त्यावर काही ठिकाणी मतदार व निवडणूक कर्मचाºयांमध्ये वाद झडले. त्यातून मतदानाला खोळंबा निर्माण झाला. काही केंद्रांवर मतदार नसल्याचे पाहून कर्मचाºयांनी भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान वाडीवºहे येथील मतदान केंद्रात विशिष्ट उमेदवाराला मतदान करतानाचे छायाचित्र फेसबुकवर टाकून गोपनीयतेचा भंग करण्यात आल्याप्रकरणी नितीन कचरू कातोरे या मतदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वॉररूमच्या माध्यमातून लक्षनिवडणूक आयोगाने एकूण मतदानाच्या दहा टक्के मतदान केंद्रावर तसेच संवेदनशील मतदार केंद्रावर वेब कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्णातील ४८६ मतदान केंद्रावरील मतदानाचे थेट प्रक्षेपण केले जात होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम कार्यान्वित करण्यात आला. या ठिकाणी प्रोजेक्टर व दूरदर्शन संचाच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. त्याचबरोबर मतदारांच्या तक्रारी सोडण्यासाठीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे आदी अधिकारी व कर्मचाºयांनी वॉर रूममध्ये तळ ठोकत प्रत्येक मतदान केंद्रप्रमुखांशी संपर्कात होते. जवळपास ५०० हून अधिक मतदारांनी वॉर रूमशी संपर्क साधून मतदार यादीत आपले नाव शोधून देण्यासाठी दूरध्वनीने संपर्क साधला.समीर भुजबळ यांच्या आईचे नाव गायबनाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचा अनुभव भुजबळ कुटुंबीयांनी घेतला. छगन भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंबीयांनी जुने सिडकोतील ग्रामोदय विद्यालय या ठिकाणी सकाळी मतदान करण्यासाठी गेल्यावर उमेदवार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, मीनाताई भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ, दुर्गाताई वाघ, डॉ. जितेंद्र वाघ यांनी मतदान केले, परंतु समीर यांच्या आई हिराबाई मगन भुजबळ यांचे मतदार यादीत नाव सापडले नाही. यावेळी भुजबळ मतदानासाठी आल्याचे पाहून अनेक मतदारांनी त्यांची भेट घेत मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी केल्या. महापालिका निवडणुकीत मतदान केले त्यावेळी नावे होती, आता मात्र जाणीवपूर्वक नावे गहाळ केल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यावर भुजबळ यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी अधिक सोयीची व्यवस्था निवडणूक आयोगाकडून होणे अपेक्षित असते, मात्र या ठिकाणी एकाच कुटुंबीयांतील सदस्यांचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर बघावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. परिणामी याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचे सांगितले. गेल्या चाळीस वर्षांपासून हिराबाई भुजबळ ह्या मतदान करीत असताना त्यांचे नाव गायब झाल्याबद्दल छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केली.मतदार यादीचा घोळ कायमसोमवारी अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने यंदा मतदारांना त्यांचे मतदार यादीत नाव असल्याबद्दल व मतदान केंद्राचे ठिकाण कळविणाºया मतदार चिठ्ठ्या वाटपाचा उपक्रम राबविला त्यातून अनेक मतदारांना बीएलओमार्फत वाटप करण्यात आल्या, तर अनेक मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारणावरून या चिठ्ठ्या तशाच पडून राहिल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. मतदानासाठी गेल्यावर यादीत नाव नसल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्तकरून माघारी फिरणे पसंत केले. दोन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत मतदान केले आता मात्र नाव कसे गायब झाले, असा प्रश्न मतदार विचारत होते. तर काही केंद्रांवर बीएलओच्याभोवती मतदारांनी नाव शोधण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या निवडणुकीत मतदान केलेले केंद्र लोकसभा निवडणुकीत बदलण्यात आल्याचे पाहून अनेक मतदारांचा गोंधळ उडाल्याचे चित्र होते. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांचे बुथ थाटण्यात आले होते. त्यात मतदारांचे नावे शोधून देण्याचे काम केले जात होते.खासदार चव्हाणांच्या गावाचा बहिष्कारदिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कळवण विधानसभा मतदारसंघांतर्गत सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. हे गाव भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे गाव असून, गेली अनेक वर्षे खासदार चव्हाण यांनी भाजपाची एकनिष्ठता दाखवूनही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून गावकºयांनी

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकVotingमतदान