शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडियन सायकल डे’च्या अधिकृत मान्यतेसाठी नाशिकचे सायकलपटू पुन्हा करणार नाशिक-मुंबई सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 22:22 IST

गोल्फ क्लब मैदान येथून रविवारी सुरू झालेली ही रॅली घोटी, कसारा, शहापूर मार्गे गेल्यानंतर भिवंडी फाटा येथे मुक्कामी राहणार आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता रॅलीचे ठाणे, घाटकोपर,दादर, भायखळा, फोर्ट मार्गे गेट वे आॅफ इंडिया असा या रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविण खाबिया यांनी दिली.

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत - हरीत भारत’ हा संदेश महात्मा गांधी जयंती ‘इंडियन सायकल डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे

नाशिक : महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २) महात्मा गांधी जयंती ‘इंडियन सायकल डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान, नाशिक ते मुंबई अशी सायकल वारी सायकलपटू करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन मागील सहा वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करत आहे. या सायकल प्रवासा दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत तसेच स्वच्छता आणि नागरी कर्तव्य आदिंचा संदेश देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाशिक सायकलिस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ‘स्वच्छ भारत - हरीत भारत’ हा संदेश घेऊन नाशिक ते मुंबई अशा सायकल प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन सायकल डे च्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. १) सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून या रॅलीला सुरूवात होणार आहे.गोल्फ क्लब मैदान येथून रविवारी सुरू झालेली ही रॅली घोटी, कसारा, शहापूर मार्गे गेल्यानंतर भिवंडी फाटा येथे मुक्कामी राहणार आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता रॅलीचे ठाणे, घाटकोपर,दादर, भायखळा, फोर्ट मार्गे गेट वे आॅफ इंडिया असा या रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविण खाबिया यांनी दिली. संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सायकल चळवळ अधिकाधिक बळकट करण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण खाबिया, किरण चव्हाण, राजेंद्र वानखेडे, नितीन भोसले, डॉ. मनीषा रौदळ आदि उपस्थित होते.