शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:53 IST

कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची मौज लुटण्यासाठी अनेक पयटकांचा नाशिककडे कल वाढला आहे. 

ठळक मुद्देनाशिकच्या हिरवळीची पर्यटकांना भुरळ पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओघ वाढलाधार्मिकसोबत निसर्ग पर्यटकांची नाशिकला पसंती

नाशिक : कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची मौज लुटण्यासाठी अनेक पयटकांचा नाशिककडे कल वाढला आहे. नाशिकमधील विविध धार्मिक स्थळे देशविदेशातील पर्यटकांकांचे आकर्षण ठरेले असून पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पसरलेल्या  निर्सग पर्यटकासोबत हिरवळीची धार्मिक पर्यटकांंनाही भुरळ पडत असून गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसासोबतच नाशिकला येणाºया पर्यटकांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. 

गेल्या दशकभरात नाशिकच्या पर्यटनाच्या कक्षा खूपच विस्तारल्या आहेत. देव-देवतांचा आशीर्वाद लाभलेल्या या भूमीला निसर्गाचेही भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्गसुंदर स्थळांना भेटी देणे हा पर्यटकांचा नित्य उपक्रम बनत असून पावसाळ््यात अनेक पर्यटक नाशिकला पसंती देत आहे. मात्र यातील अनेक पर्यटक गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने कोणतीही पूर्व तयारी न करताच नाशिकच्या पर्यटनासाठी बाहेर पडल्याने त्यांनी शनिवारपासून कोसळणाºया संततधार पावसाने काहीसी गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी पर्यटक पावसापासून बचावासाठी पास्टिकच्या पानघोंगड्यांचा आधार घेताना दिसून येत आहे. तर अनेक पर्यटकांना नाशिकचा मुक्काम वाढवावा लागत असून स्थानिक बाजारपेठेतन रेनकोट छत्र्यांची खरेदी करून अनेक पर्यटक नाशिक पर्यटनाचा आनंद लूटत आहेत. त्यासोबतच कोणत्याही निव्वल पावसात भिजून चिंब होण्यासाठीही अनेक पर्यटक गोदा काठावर दाखल झाल्याचे दिसून येत आहे. 

पर्यटनाची आकर्षणे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिक पर्यटनस्थळांत नाशिकचे आगळेच स्थान असून  त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंगसह ब्रह्मगिरी, गंगाद्वार, संत निवृत्तीनाथ मंदीर, सप्तश्रुंग गड, चांदवडची रेणूकादेवी, टाकेदचे जटायू मंदीर, अंजनेरीचे हनुमान मंदीर, रामदास स्वामींची टाकळी, इगतपुरीतील घाटनदेवी, कावनई तीर्थक्षेत्र,   पंचवटीचा गोदाघाट, तपोवन, सिंहस्थ गोदावरी मंदीर, गंगा गोदावरी मंदीर, काळाराम मंदीर, कपालेश्वर मंदीर, सुंदर नारायण मंदीर, नारोशंकराची घंटा, दुतोंड्या मारुती, बालाजी मंदीर, मुरलीधर मंदीर, यशवंतराव महाराज मंदीर, सीतीगुंफा, मोदकेश्वर गणपती, काट्या मारुती, भक्तीधाम, मुक्तीधाम, गुरू गंगेश्वर मंदीर, पांडवलेणी, बुध्द स्मारक,  चामरलेणी अशी एक ना अनेक धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. साईबाबांच्या शिर्डीमध्ये येणारे देश विदेशातील भाविकांना नाशिकच्या पर्यटनाची आकषर्ण असलेली कें द्र भुरळ घालताना दिसून येत आहे.