शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या उद्योजकाची गोळी झाडून घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:15 IST

नाशिक : शहरानजीक असलेल्या यशवंतनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे(वय ५५, सामोडे, साक्री. हल्ली मुक्काम नाशिक) यांनी ...

नाशिक : शहरानजीक असलेल्या यशवंतनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे(वय ५५, सामोडे, साक्री. हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

बुधवारी (दि. ७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, आत्महत्या केलेले नंदलाल शिंदे हे मोठे उद्योजक असल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदलाल शिंदे हे स्वत:च्या स्कोडा रॅपिड कारमधून (क्र. एमएच १५ एफटी ०१३३)) सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. नंदलाल शिंदे हे ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर जवळ आले असता त्यांचे मावसभाऊ यांच्याशी बोलणे झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून मी सटाण्याजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे त्यांनी आपल्या मावस भावाला मोबाइलद्वारे कळविले होते. दरम्यान, शिंदे यांचा मावसभाऊ व इतर काही नातेवाईक ताहाराबादजवळ होते. मावसभाऊ व इतर दोन नातेवाईक ताहाराबाद रोडवरील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर पोहोचले असता नंदलाल शिंदे हे आपल्या स्कोडा कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

इन्फो

पोलिसांकडून रिव्हॉल्व्हर ताब्यात

सटाणा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले. घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून, पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.