शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बनले ‘फॉगसिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने ...

मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता अन‌् वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेपासूनच शहरासह जिल्ह्यात धुके दाटण्यास सुरुवात झाली होती. तत्पूर्वी रात्री नऊ वाजतापासून शहरात दवबिंदूंचा वर्षाव होत होता. तो पहाटेपर्यंत सुरूच होता. पहाटे अचानक धुक्यात प्रचंड वाढ होऊ लागली आणि शहर जणू धुक्यात गडप झाले होते. सकाळी साडेआठ वाजता पेठरोडवरील हवामान केंद्राकडून ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली. सकाळी दहा वाजतानंतर शहरासह उपनगरांमध्येही सूर्यदर्शन घडले. यामुळे सायंकाळपर्यंत आर्द्रतेचे प्रमाण थेट ७६ टक्क्यांवर आले होते, तसेच कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ढगाळ हवामान कमी झाल्याने शहराचे कमी झालेले कमाल तापमान वाढण्यास मदत झाली. तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा थेट २३ अंशापर्यंत खाली घसरला होता आणि वातावरणातील आर्द्रतेचेही प्रमाण सकाळी ९० अन‌् सायंकाळच्या वेळी ८०च्या आसपास राहत होते. पावसाच्या सरी, वातावरणात वाढलेला गारठा अन‌् ढगाळ हवामान अशा विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागला होता.

--इन्फो--

आर्द्रतेने गाठला उच्चांक

नाशिकमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून सकाळच्या सुमारास आर्द्रतेचे प्रमाण वाढते होते. १२ तारखेपासून सकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढतच गेले. ८१ टक्क्यांपासून मंगळवारपर्यंत आर्द्रता थेट ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. यामुळे शहरात प्रचंड धुके पसरले होते.

---इन्फो--

वर्षनिहाय डिसेंबरमधील निचांकी तापमान असे...

२०२०- १०.६

२०१९ - ११.४

२०१८ - ५.१

२०१७ - ७.६

२०१६ - ७.५

२०१५ - ५.४

२०१४ - ६.१

२०१३ - ६.५

२०१२ - ६.२

----इन्फो---

महाबळेश्वरइतकाच नाशकाचा घसरला पारा

मंगळवारी राज्यात महाबळेश्वर अन‌् नाशिकला किमान तापमानाचा पारा १५.४ अंशापर्यंत खाली घसरला. राज्यात मंगळवारी केवळ या दोन शहरांमध्येच थंडीचा कडाका जाणवला. नाशिकनंतर औरंगाबादेत कमी किमान तापमान मोजले गेले. नाशिक फॉगसिटीसोबत कुलसिटीदेखील ठरत आहे.

-----कोट---

हिवाळा ऋतु अन‌् किमान तापमानात होणारी घट अन‌् हवेतील बाष्प व आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे अचानक धुके वाढले. रविवारी संध्याकाळी कोसळलेल्या सरींमुळेही धुक्याला निमंत्रण मिळाले. सूर्यदर्शन घडल्यामुळे ढग वितळू लागले आहे. जसेजसे आकाश निरभ्र होत जाईल, तशी थंडीची तीव्रता यापुढे अधिक वाढत जाणार आहे. डिसेंबरअखेरीस नाशिक शहर व निफाड, मालेगावात किमान तापमानाचा पारा ५अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.

-सुनील काळभोर, हवामान तज्ज्ञ, नाशिक केंद्र प्रमुख.