शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फरार वैशाली वीर यांच्या मागावर आता नाशिक एसीबी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 01:47 IST

नाशिक : शाळांना मंजूर अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढण्यासाठी तडजोडीअंती आठ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक ...

ठळक मुद्देदोन पथकांकडून शोध : ठाण्याच्या सापळा पथकाला उशिरा सुचले शहाणपण

नाशिक : शाळांना मंजूर अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढण्यासाठी तडजोडीअंती आठ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली पंकज झनकर-वीर ठाणे एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात मंगळवारी सायंकाळी अडकल्या; मात्र पहाटेच्या सुमारास पथकाला गुंगारा देत त्या शहरातून निसटल्या. मुख्य संशयित असलेल्या वैशाली वीर यांचा शोध दोन दिवसांपासून ठाणे सापळा पथकाकडून घेतला जात आहे; मात्र त्यांना यश येत नसल्याने अखेर गुरुवारी ठाण्याच्या सापळा कारवाई पथकाने नाशिक एसीबीची मदत घेणे पसंत केले.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी नाशिकमध्ये येऊन जिल्हा परिषदेबाहेर यशस्वीरित्या सापळा रचून वैशाली वीर यांच्यारूपाने मोठा मासा गळाला लावला. त्यांच्या आदेशान्वये तक्रारदाराकडून सुमारे आठ लाखांची रोकड घेताना शासकीय मोटार चालक संशयित ज्ञानेश्वर येवलेला रंगेहात पकडले. तसेच प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनाही अटक केली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सापळा कारवाई पथकाकडून वैशाली वीर यांची चौकशी व पडताळणी करण्यात आली होती. सकाळी वीर निसटल्याने सापळा पथकाची भंबेरी उडाली. त्यामुळे न्यायालयात रिमांड रिपोर्टमध्ये वीर यांना फरार दाखवावे लागले अन‌् संशयाची सुई ठाणे एसीबीच्या सापळा पथकाच्या दिशेने फिरली. दरम्यान, आता ठाणे सापळा पथकासह नाशिक एसीबीची दोन पथके झनकर-वीर यांचा समांतर शोध घेत आहेत.

--इन्फो--

दाखविला विश्वास अन‌् झाला विश्वासघात

सायंकाळनंतर महिला संशयिताला कायद्याने अटक करता येत नसल्याने पथकाने समन्स बजावून वैशाली वीर यांना सकाळी हजर राहण्याचे आदेशित केले. त्यांना हजर करण्याची हमी त्यांचे दीर आणि भावजय यांनी घेतली. सापळा पथकाने त्यांच्यावर विश्वास दाखविला अन‌् वैशाली वीर यांच्या निसटण्याचा मार्ग त्याचवेळी मोकळा झाला. कारण पथकाने त्यांच्या राहत्या निवासस्थानाबाहेर रात्रभर कडा पहाराही ठेवलेला नव्हता.

--इन्फो--

सापळा पथकाला फाजील आत्मविश्वास भोवला

ठाणे एसीबीच्या सापळा पथकाने कारवाई केल्यानंतर अतिरिक्त मदत म्हणून नाशिक परिक्षेत्राच्या एसबीच्या पथकाला सोबत घेतले असते, तर वाढीव मनुष्यबळाचा दबाव आणि नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांच्या अनुभवाचा फायदा सापळा पथकाला झाला असता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. ठाण्याच्या पथकाला फाजील आत्मविश्वास भोवला. सापळा कारवाई जरी यशस्वी ठरली तरी, मुख्य संशयितावर अंकुश ठेवण्यास पथक सपेशल अपयशी ठरले.

--कोट--

ठाणे एसीबीच्या कारवाई सापळा पथकाने अतिरिक्त मदत मागितली असता, तत्काळ दोन पथके जिल्ह्यात झनकर यांच्या शोधार्थ रवाना केली आहेत. त्यांचे जवळचे नातेवाईक आणि ते जेथे जाऊ शकतात अशा सर्व ठावठिकाणांची माहिती घेऊन पथके कार्यरत आहेत. त्यांना अटक करण्यास पथकांना लवकरच यश येईल.

- सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.लु.प्र. विभाग. नाशिक परिक्षेत्र

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदBribe Caseलाच प्रकरण