नाशिक : शहराचे कमाल तपमान आठवड्यापासून ३५.५ अंशावर स्थिरावले होते; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा तपमान वाढत असून बुधवारी (दि. १) शहराचे तपमान ३७.२ अंश इतके नोंदविले गेले. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून नाशिककरांना वाढत्या उष्म्याने दिलासा मिळाला होता. उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव नाशिककर घेत होते; मात्र दोन दिवसांपासून पारा पुन्हा चाळिशीकडे सरकत असल्याने उन्हाची तीव्रताही वाढत आहे. (प्रतिनिधी)
नाशिक @ 37
By admin | Updated: June 2, 2016 00:11 IST