शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात एकाच दिवशी ५ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:34 IST

नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याशिवाय अजून एका रुग्णाची भर शहरात तर सिन्नरमध्ये आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.मालेगावमध्ये तर एका दिवसात तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, नाशिक शहरामध्ये सर्वप्रथम आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने हा रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच मालेगावच्या २८ आणि नाशिक मनपा हद्दीतील १७ अशा एकूण ४५ संशयितांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याचा दिलासा मिळाला आहे.नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा नित्यनेमाने वाढत असताना नाशिक शहरातील बाधित रुग्णसंख्या काही दिवसांपासून पाचवरच स्थिरावली होती. त्यामुळे नाशिक शहरात फारशी वाढ होत नसल्याचे काहीसे समाधान नाशिककरांना होते. मात्र, शनिवारी अचानकपणे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नाशिक शहरातील बाधितांची रुग्णसंख्या थेट दहावर पोहोचली आहे. त्यामुळे नाशिकच्या अन्य तालुक्यांतील चार बाधित रुग्ण आणि मालेगावसह नाशिक येथील एकूण रुग्णसंख्या ९१ पर्यंत जाऊन पोहोचली आहे.नाशिक शहरातील १७ संशयितांचे अहवाल शनिवारी सकाळीच प्राप्त झाले असून, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शनिवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या मालेगाव आणि नाशिकचे मिळून एकूण ४५ अहवाल निगेटिव्ह, तर नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.---------मालेगावात पंधरा रुग्ण पॉझिटिव्हमालेगावातही रात्री १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मालेगावची बाधित संख्या ७७वर पोहोचली आहे. मालेगावचे बहुतांश रुग्ण हे यापूर्वी बाधित ठरलेल्या रुग्णांच्या नातेसंबंधातीलच असल्याचे समजते. शनिवारी आढळलेले पंधरा रुग्ण हे युवा ते मध्यमवयीन गटातील आहेत. दरम्यान, मालेगावच्या संशयितांचे २८ अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.------------------नाशिकचे कोरोनाबाधित एकाच कुटुंबातीलचार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या वृद्धेच्या कुटुंबातील चारही सदस्य कोरोनाबाधित आढळले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आढळण्याची नाशिकमधील ही पहिलीच वेळ आहे. चारही पॉझिटिव्ह रुग्ण हे पती-पत्नी आणि दोन मुलगे असल्याने बाधितांच्या परिसरात खळबळ उडाली आहे. त्याशिवाय अन्य एक कोरोनाबाधित हा दुसऱ्या भागातील नागरिक आहे.

टॅग्स :Nashikनाशिक