शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या नासाका रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:40 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नासाका रोडची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी लक्ष घालून तात्पुरती डागडुजी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नासाका रोडची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी लक्ष घालून तात्पुरती डागडुजी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पळसे येथील नाशिक साखर कारखाना हा रस्ता कारखान्याच्या स्वमालकीचा असल्याने त्यावर शासनाकडून खर्च केला जात नाही. माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत आर. आर. पाटील यांना आमंत्रित केले होते. तेव्हा मुरूम टाकून तात्पुरता रस्ता बनविण्यात आला होता. मात्र त्यानंतर कारखानाच बंद पडल्याने  नासाका रोडला वालीच राहिलेला नाही. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा नासाकारोड आहे. नासाका रोडवर वडगाव पिंगळा, राहुरी, दोनवाडे, नानेगाव, शेवगदारणा ही गावे असून येथून अजून आजूबाजूच्या गावांत जाता येते. त्यामुळे नासाका रोडवर विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदींची सतत वर्दळ असते. मात्र नासाका रोडला कोणी वालीच नसल्यामुळे रस्त्यावरील डांबर नाहीसे झाले असून ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.ग्रामस्थांना दुसरा पर्यायच नसल्यामुळे याच मार्गावरून ये-जा करावी लागते. तर सायकलस्वार, दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने यांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात. यामुळे वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्ता हस्तांतर करून घ्यावाकारखान्याच्या मालकीचा असलेला नासाकारोड दुरुस्ती करण्यास हरकत नसल्याचे पत्र कारखान्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेला सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आले आहे. त्यामुळे खासदार, आमदारांनी लक्ष घालून नासाकारोड राज्य शासनाकडे हस्तांतरित करून त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करून द्यावे. राज्य शासनाकडे रस्ता हस्तांतरित झाल्यास या ग्रामीण भागाचा प्रश्न कायमचा निकाली निघेल.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नाशिकरोड बसस्थानकातून येणारी बस काही महिन्यांपूर्वीच बंद झाल्याने शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहे. सिन्नर डेपोची सायंकाळी येणारी एकमेव बस वडगाव पिंगळा येथे मुक्कामासाठी असते. सकाळी चिंचोली किंवा पुन्हा बंगाली बाबा दर्गा मार्गे निघून जाते. पावसाळा सुरू झाला असून, अजून म्हणावे तसे पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी पाहणी करून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक