शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:47 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरुंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपा खेळू पाहत आहे.

ठळक मुद्देविधान परिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे?भुजबळांना देणार शह : शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम

श्याम बागुल।नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरुंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपा खेळू पाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तूर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित मांडण्यात येत आहे.नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी, त्यांच्या महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राणे यांना राज्यमंत्रिमंडळात प्रवेश देण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षावर येऊन पडली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसे संकेतही वारंवार दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले . राजकीय पातळीवर विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर भाजपा-सेनेत एकमत झालेले आहे. त्यावेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सदस्याला सहा महिन्यांच्या आत विधान सभा वा विधान परिषदेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अलीकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाºया नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे खात्रीशीर सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले छगन भुजबळ नजिकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांदा भाजपाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील. अशावेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. याशिवाय जिल्ह्णात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिंमत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे.सख्य कामी येणार नारायण राणे यांचा तसा नाशिकशी घनिष्ठ संबंध असून, येथील राजकीय परिस्थिती त्यांना चांगलीच अवगत आहे. राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी सेना-भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचे चांगले सूत जमले होते. त्यानंतर त्यांनी कॉँग्रेस प्रवेश केल्यावरही हा लोभ कायम होता. राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाचे तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील कामगार युनियनचे अजूनही लागेबांधे आहेत. अशा परिस्थितीत राणे यांचे नेतृत्व सर्वमान्य होण्याची भाजपाला पुरेपूर खात्री आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीसाठी लागणारे ‘तोड-फोडी’चे राजकारण करण्यात राणे यांचा हातखंडा आहे. दुसरे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजपा व सेना स्वतंत्रपणे लढणार असल्याने या निमित्ताने सेनेला खिजविण्याची आयती संधी भाजपाला मिळणार आहे.