शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नार-पार गिरणा नदीजोड योजनेत फेरबदल अन्यायकारक ; पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 14:50 IST

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी तसेच राज्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...

ठळक मुद्देजलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार भूमिकालोकप्रतिनिधींची एकजूट

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी तसेच राज्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नदीजोडमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.बुधवारी (दि. २२) शासकीय विश्रामगृहावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार व खासदारांना नार-पार व गिरणा नदीजोड योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या प्रकल्पातून महाराष्टÑाला ८८७ दलघमी पाणी मिळणार आहे. त्यातील ४३४ दलघमी पाणी गुजरातला देण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले असून, उर्वरित ४०३ दलघमी पाणी महाराष्टÑासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. मात्र, राज्यात उपलब्ध होणारे सर्वच्या सर्व पाणी महाराष्टÑालाच मिळाले पाहिजे, अशी भूमिका उपस्थित खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार दीपिका चव्हाण, आमदार कुणाल पाटील यांनी घेतली. त्याचवेळी नार-पार प्रकल्पाचे अभ्यासक विश्वास देवरे यांनी जलसंपदा खात्याच्या कारभारावर टीका करीत चुकीच्या पद्धतीने प्रकल्प अहवाल तयार केल्याचे सांगितले. यावेळी बैठकीस उपस्थित जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता डी. बी. मुसळे यांनी आधीच्या व नंतरच्या नवीन प्रकल्प अहवालाची माहिती दिली. गणेश धात्रक यांनी मनमाड व नांदगावलाही या योजनेतून काही तरी पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली, तर बुवा यांनी चांदवडवर नेहमीच अन्याय होत असल्याची टीका केली. आमदार जे. पी. गावित यांनी जलसंपदा विभागावर टीका करताना स्थानिकांना विश्वासात न घेताच योजना व प्रकल्प तयार केले जातात; मात्र आमच्यावर अन्याय झाल्यास तुमच्या योजना कागदावरच राहतील, असा इशारा दिला. माजी आमदार संजय चव्हाण यांनी पहिलाच प्रकल्प अहवाल कायम ठेवण्याची मागणी केली. या योजनेचे नव्याने फेरसर्वेक्षण करून उपस्थित लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊ, असे आश्वासन महेंद्र आमले यांनी दिले. आमदार कुणाल पाटील यांनी धुळे व जळगावसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून, यापुढील बैठकांना उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींना बोलवा, अशी सूचना केली.