शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य पायी दिंडीचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:54 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील पायी दिंडीचे त्र्यंबकेश्वरकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरि च्या जयघोष तसेच टाळमृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे संत निवत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे मंगळवारी सकाळी प्रस्थान झाले.

ठळक मुद्देवारकऱ्यांच्या पायी दिंडीचे मंगळवारी सकाळी प्रस्थान झाले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील पायी दिंडीचे त्र्यंबकेश्वरकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरि च्या जयघोष तसेच टाळमृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे संत निवत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे मंगळवारी सकाळी प्रस्थान झाले.यावर्षीही संत निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ फुलांनी सजवण्यात आला होता. या रथामध्ये पांडुरंगाची प्रतिमा तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या ठेवलेल्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर पायी दिंडीची गावातुन फेरी काढत टाळमृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करण्यात आले. यावर्षी देखील नांदूरवैद्य परिसरात अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. थंडीच्या कडाक्यातही विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी दिंड्यांमध्ये सामील झाले आहे. दोन दिवसांमध्ये दहा ते पंधरा दिंड्यांचा मुक्काम नांदूरवैद्य येथे झाला. महाप्रसाद झाल्यानंतर हरिपाठ, भजन, कीर्तनाने रात्रभर जागर करीत भाविकांची हरिनामाचा जप करीत होते. पहाटे काकड आरती नंतर त्र्यंबकेश्वरकडे पालख्यांचे प्रस्थान झाले. या पायी दिंडीमध्ये नामदेव महाराज डोळस, अतुल महाराज तांबे, सखाहारी महाराज काजळे, माजी सैनिक तुकाराम काजळे, माजी सैनिक कुंडलिक मुसळे आदींसह असंख्य ग्रामस्थ वारकरी सहभागी झाले होते.