शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:09 IST

सिन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया व परिसराचे लक्ष लागून असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने जनसेवा, नम्रता, क्र ांती व अपक्ष यांच्याते लढत होत आहे. गाव पातळीवर प्रथमच प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया व परिसराचे लक्ष लागून असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने जनसेवा, नम्रता, क्र ांती व अपक्ष यांच्याते लढत होत आहे. गाव पातळीवर प्रथमच प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शेवटचे गाव तसेच परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नांदूरशिंगोटे गावाची ओळख आहे. थेट जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने यावेळी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.या निवडणुकीत प्रथमच सरपंचपद हे जनतेतून निवडले जाणार असून उमेदवारांनी आपला प्रचार हायटेक केला आहे. ७ आॅक्टोबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. गावात तिन्ही पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांनी आपापल्या पक्षाची कार्यालये थाटली आहेत. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल बॅनर झळकत आहेत. त्यामुळे गावात राजकीय वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी थेट सरपंच निवडीमुळे राजकीय संदर्भ बदलेले आहे. फक्त वॉर्डच नव्हे तर आता संपूर्ण गावातील मतदार सांभाळणे हे सरपंचपदाच्या उमेदवारांपुढे आव्हान आहे. त्यातच वार्डातील सदस्यपदाच्या उमेदवारांचेदेखील मन सांभाळण्याची वेळ आल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.प्रथमच सरपंचपदासाठी संपूर्ण गाव मतदान करणार असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारासाठी गाव हा मतदारसंघ झाल्याने घराघरात प्रचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांनी तर संपूर्ण कुटूंबच प्रचारासाठी उतरविले आहेत. वाडी वस्त्यांवर भेटीगाठी सुरु केल्या आहे. वार्डातील सदस्यांचे उमेदवार देखील सरपंच पदाच्या उमेदवाराला मत मागणार असल्याने त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर जनसेवा विकास पॅनलने येथील रेणुका माता मंदिरात नारळ वाढवून प्रचारास सुरवात करुन आघाडी घेतली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाºया नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतसाठी पाच प्रभागात एकूण ४ हजार ५६८ मतदार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गावच्या राजकारण पहिल्यांदा एकाही गटाला पूर्ण पॅनलची निर्मिती करता आली नाही.जनसेवा पॅनलने सरपंचसह ११, नम्रता विकासने १० तर क्रांती पॅनलने ४ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी ६ तर पाच प्रभागातून १३ जागासाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.