शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेला प्रथमच सभापतिपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:05 IST

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी तालुक्यातील नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बर्के यांच्या रूपाने तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर गावात समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देजल्लोष : शोभा बर्के यांच्या रूपाने मिळाली संधी

सचिन सांगळे ।सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी तालुक्यातील नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बर्के यांच्या रूपाने तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर गावात समर्थकांनी जल्लोष साजरा केला.सिन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची मंगळवारी निवड झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळीच माजी आमदार राजाभाऊ वाजे व शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांनी बर्के यांना सभापतिपदाचा शब्द दिला होता. त्यांच्या रूपाने प्रथमच नांदूरशिंगोटे गावाला सभापतिपद मिळाले आहे. यापूर्वी नांदूरशिंगोटे गणातील दोडी बुद्रुक येथील स्व. दादा गणपत केदार व बाळासाहेब वाघ यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर नांदूरशिंगोटे येथील लक्ष्मण शेळके यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या काळात अडीच वर्षे उपसभापतीची संधी मिळाली होती.सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच तालुक्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नांदूरशिंगोटे गावाला यापूर्वी तालुकापातळीवर मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे समर्थकांची गेल्या अनेक वर्षांपासून नाराजी होती. येथील अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा व तालुका तसेच बाजार समिती, दूध संघ, नाईक शिक्षण संस्था आदींसह विविध पदावर काम केले आहे, परंतु तालुक्याचे मिनी मंत्रालय असणाºया ठिकाणी काम करण्याची संधी अद्याप मिळालेली नव्हती. बर्के यांच्या रूपाने पंचायत समिती स्थापनेनंतर पहिल्यांदाच तो बहुमान नांदूर गावाला मिळाला आहे. सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे समर्थक नांदूरशिंगोटे येथील दीपक बर्के यांच्या पत्नी शोभा बर्के या शिवसेनेच्या तिकिटावर नांदूर गणातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.मानोरी गावात विजयी मिरवणूकनांदूरशिंगोटे गणातील पंचायत समिती सदस्य शोभा बर्के यांची सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याने समर्थकांनी गावात एकच जल्लोष केला. येथील रेणुकामाता मंदिराच्या पटांगणात ग्रामस्थ व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. बर्के यांचे माहेर असलेल्या मानोरी गावात सुद्धा विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विकासकामे केली जातील. तालुक्यातील गावांना समान न्याय देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहील. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व शासकीय योजना तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आपले प्राधान्य राहील. - शोभा बर्के, नवनिर्वाचित सभापती, पं. स. सिन्नर.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती