शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:22 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते परंतु रस्त्याची अवस्था जैसे-थे असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देजीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत

नांदूरशिंगोटे - निमोण रस्ता नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चार ते पाच तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. निमोण रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात सदर रस्त्याची दुरावस्था होत आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, मढी, भगवानगड आदी तिर्थक्षेत्र असणाºया ठिकाणी याच रस्त्याचा वापर केला जातो. मालवाहतूकीचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता नेहमीच खराब होत आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने चिखलातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागते. नांदूरशिंगोटे ते निमोण हा सात किलोमीटरचा रस्ता असून अडीच किलोमीटर पर्यंत जिल्हा हद्द आहे. परिसरातील गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने वाहन धारकांना खड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. नांदूरशिंगोटे गावातील दहा टक्के नागरिक निमोण रोड लगत वस्तीवर वास्तव करत असल्याने त्यांना गावात दळणवळणासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हापूर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर जागोजाग खडे पडल्याचने वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्यावेळी अंधारात खड़े वाचविताना दुचाकीस्वारांचे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. लोणी रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दररोजची डोकेदुखी ठरत असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे.अरुण शेळके, संचालक, लोकशिक्षण मंडळ, नांदूरशिंगोटेसिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्याची झालेली दुरावस्था. (२० सिन्नर २)

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग