शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राला लावले नांदुरी ग्रामस्थांनी कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:50 IST

कळवण : तालुक्यातील नांदुरी येथे बसस्थानकासमोर दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक महिला जखमी झाल्याने अपघातग्रस्त महिलेला नांदूरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु दवाखान्यात कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करु न प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देकळवण : वैद्यकीय अधिकारी नसल्यानेनागरीक संतप्त

कळवण : तालुक्यातील नांदुरी येथे बसस्थानकासमोर दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक महिला जखमी झाल्याने अपघातग्रस्त महिलेला नांदूरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु दवाखान्यात कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करु न प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.दरम्यान वैद्यकीय अधिकारी व इतर यंत्रणा नसल्याने उपस्थित दोघा शिपाईनी जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करु न कर्तव्य पार पाडले. सकाळी घटना घडल्यानंतर सप्तशृंगी गडावरील माजी सरपंच संदीप बेनके यांना नाना सदगीर यांनी मोबाईलद्वारे माहिती दिली.संदीप बेनके यांनी वैद्यकीय यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आल्याने कळवणचे आमदार नितीन पवार यांना भ्रमणध्वनी करु न माहिती दिली. नांदुरी येथील आरोग्य केंद्र फक्त शोभेचे बाहुले बनून उभे असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावा अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी करु न वरिष्ठ यंत्रणेशी संवाद साधतं वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात थांबत नसतील आणि रु ग्णाचे हाल होत असतील तर असे आरोग्य केंद्रच बंद करा अशी सूचना करु न तालुक्यात निष्काळजीपणा झाल्यास कारवाई करण्यास गय करणार नाही असा इशारा आमदार पवारांनी वरिष्ठाना देत वैद्यकीय अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याची सूचना केली.नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ अधिकारी व कर्मचारी काम करतात. परंतु प्रत्यक्षात एक दोनच कर्मचारी कार्यरत असतात असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या आरोग्य केंद्राला कुलुप (टाळे) ठोकण्यास आमदार पवार यांनी सांगितले. व जो पर्यंत कायम स्वरु पी वैद्यकीय अधिकारी या केंद्राला मिळत नाही तो पर्यंत ठाळे उघडु नका अशी सूचना केली.प्राथमिक आरोग्य केंद्राला नांदुरीचे माजी सरपंच सुभाष राऊत सप्तशृंगी गडावरील माजी उपसरपंच संदीप बेनके, नाना सदगीर, उत्तम राऊत, जितेंद्र हिरे, देविदास चव्हाण, ताराचंद चौधरी आदींनी प्राथमिक आरोज्य केंद्राला कुलूप ठोकले.दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे टाळे उघडले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांच्याशी संपर्क साधुन दोन वैद्यकीय अधिकारी तात्काळ बदलुन देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.कळवण तालुक्यात आरोग्य यंत्रणा आदिवासी जनतेशी सापत्नक वागणूक देत असल्याच्या तक्र ारी असून यंत्रणा आरोग्य केंद्रात थांबत नसतील आणि रु ग्णाचे हाल होत असतील तर कारवाई करण्यात गय करणार नाही. रु ग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी आपला प्रयत्न राहील.- आमदार नितीन पवारनांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वारंवार असा प्रकार घडत असुन सप्तशृंग घाटात अनेकदा लहान मोठे, अपघात घडत असतात व मी स्वत: जखमी रु ग्णांना या दवाखान्यात घेऊन येतो. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याचे निदर्शनास आले असुन परीचारक उपचार व औषधे देतात यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- संदिप बेनके, सप्तशृंगगड.नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्र ारी आल्या असुन या बाबत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही लेखी व तोंडी स्वरु पात तक्र ार केली असुन आम्ही वैद्यकीय अधिकाºयांनी शेरेबुकावरही याबाबत नोंद केली आहे. ते शेरेबुकही नांदुरी आरोग्य केंद्रातून गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.--डॉ. सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, कळवण. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलGovernmentसरकार