शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: November 23, 2014 23:11 IST

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

नांदूरशिंगोटे : नांदूरशिंगोटे - चास -नळवाडी-कासारवाडी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. नांदूरशिंगोटे व चास ही दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी असतानाही या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर नांदूरशिंगोटे, चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदिं गावे आहेत. सिन्नर व अकोले तसेच संगमनेर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरशिंगोटे ते चास या रस्त्याची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी डांबर उखडले आहे, तर अनेक ठिकाणी रस्ता अक्षरश: खचून गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या नांदूरशिंगोटे ते चास या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील या रस्त्याकडे दहा वर्षांत पुन्हा लक्ष देण्यात आलेले नाही. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. सदर रस्ता पुढे अकोले व संगमनेर तालुक्यांत जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त असते. तथापि, रुंदी कमी झाल्याने या रस्त्याने एकावेळी एकच वाहन चालण्यास जागा राहिली आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रसंग नित्याचे झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेण्यासाठीही हाच रस्ता सोयिस्कर असल्याने या मार्गे अवजड वाहनांचीही वर्दळ नेहमीचीच झाली आहे. गेल्या वर्षी खासदार निधीतून या भागातील चास-नळवाडी, कासारवाडी-चास, नळवाडी-कासारवाडी आदि एकेक किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेले असतानाही त्यांची कामे अपूर्ण आहेत. या भागात दोन जिल्हा परिषद सदस्य असतांनाही रस्त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा होत नसल्याने भोजापूर खोरे व नांदूरशिंगोटे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नांदूरशिंगोटे ते चास या महत्त्वाच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जगनपाटील भाबड, शंकर सानप, आनंदा शेळके, शंकर शेळके, पोपट शेळके, शिवाजी दराडे, रावसाहेब दराडे, दीपक बर्के, बाळासाहेब देशमुख, सुनील खैरनार, संजय खैरनार, सुभाष दराडे, राजेंद्र शेळके, मंगेश शेळके, भारत दराडे, सुदाम आव्हाड आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)