नांदगाव : शहराला १९ ते २२ दिवसांनी आवर्तन सुरू असून धरणातून आलेल्या पाण्यातील गाळ नळातून येत असल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याची तक्रार करणारे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. चार पदरी फडक्याने पाणी गाळूनही पाण्यातला गढूळपणा जात नाही व त्याला येणारा मातकट वास कमी होत नाही. अॅक्वा गार्डसारख्या पाणी शुद्धीकरण करणाऱ्या यंत्रांचाही परिपूर्ण उपयोग होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.पंधरा दिवसांपूर्वी माजी उपनगराध्यक्ष सीमा राजोळे यांनी नळातून गाळमिश्रित पाणी येत असल्याची लेखी तक्रार मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्याकडे केली होती. पण दातीर यांनी शुद्धीकरण प्रक्रियेत दुरुस्ती न करता, थातुरमातुर उत्तरे देऊन राजोळे यांच्या तक्रारीला टोपली दाखविण्यात आल्याचे यावेळी आलेल्या गढूळ पाण्याने सिद्ध झाले आहे. (वार्ताहर)
नांदगावला गढूळ पाणीपुरवठा
By admin | Updated: July 31, 2016 22:27 IST