नांदगाव नगरपरिषदेच्या मदतीला रविवारी सकाळी मालेगाव महापालिकेचे दोन अग्निशमन बंब, चार ट्रॅक्टर व ७५ कामगारांची टीम येऊन दाखल झाली. उच्च दाबाने पाण्याचा फवारा मारून गाळ काढण्याचे व पाठोपाठ जंतू नाशकांची फवारणी करण्याचे काम सुरू झाले. अहिल्यादेवी चौक, भेंडी बाजार रस्ता, गुलजार वाडी व समता मार्ग या भागात गाळ काढण्याचे व सफाईचे काम सुरू आहे. रेल्वे लाईन ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सब वे वर अद्याप पाणी आहे. त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
इन्फो
बुडत्याला लोखंडी हॅन्डलचा आधार
सोनुशेठ गायकवाड यांच्या भेंडी बाजार रस्त्यावरील कापड दुकानात चार फुट पाणी होते. पुराच्या रात्री दुकानाच्या वरच्या पायरीवर गावात नेहमी फिरणारा एक बाबुशेठ नामे इसम झोपला होता. मध्यरात्री थंडगार पाण्याची लाट अंगावर आली आणि त्याचे डोळे खाडकन उघडले. डोळे चोळत असताना पाण्याचा पुढचा लोंढा येऊन धडकला. रस्त्यापासून दुकान दोन फुट उंचीवर व दुकानातले पाणी साडेतीन फुट उंचीवर. त्यामुळे रस्त्यावर उतरलो तर गुदमरून मरण्याचे चान्सेस जास्त. म्हणून बाबुशेठने प्रसंगावधान राखत चार फुट उंचीवर असलेल्या लोखंडी ˈहॅन्ड्लला पकडले व नंतर पुढचे चार तास त्याला घट्ट पकडून ठेवले. सकाळी लोक दिसल्यावर त्याने आरडा ओरडा करून लक्ष वेधले तेव्हा त्याची सुटका झाली.
फोटो - १२ नांदगाव क्लॉथ/१
दुकानात कपड्यांचा खच पडला असून ग्राहक त्यातून पसंती करत आहेत.
दुकानात गर्दी झाल्याने दुकानदाराने अडसर लावून महिला ग्राहकांना बाहेर थोपवले आहे.
120921\12nsk_8_12092021_13.jpg
फोटो - १२ नांदगाव क्लॉथ/१