शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावला अनेक मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला

By admin | Updated: January 22, 2017 23:33 IST

चोर सराईत : नांदेश्वर महादेव, हनुमान, मल्हारवाडीतही मारला हात

नांदगाव : शनिवारच्या (दि. २१) रात्री येथील चार मंदिरांच्या दानपेट्या फोडण्यात आल्या असून, सर्व मंदिरे मिळून ४२ हजार रुपये चोरी गेले आहेत. आधी टेहाळणी व नियोजन करून या चोऱ्या झाल्या आहेत. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आधीसुद्धा शहरात अशाच प्रकारे चोऱ्या झाल्याची नोंद आहे.  स्टेट बँकेमागील नांदेश्वर महादेव मंदिरात सकाळी दर्शनासाठी गेलेल्या रेखा पोटे यांना मंदिरात दानपेटी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मंदिराशेजारील विशाल अग्रवाल यांना कळविले. दानपेटीचा शोध घेतला असता ती थोड्या अंतरावर असलेल्या स्टोअर रूमच्या बाहेर मिळून आली. रूमचा दरवाजा तोडून आतमधील लोखंडी कपाट फोडण्यात आले होते. दानपेटीत सात ते आठ हजार रुपये असावा, असा अंदाज योगेश सरोदे यांनी व्यक्त केला. सुटी नाणी पेटीत सोडून फक्त नोटा घेऊन चोरटे पसार झाले. याआधी उरुस जत्राप्रसंगी संध्याकाळी आठ वाजता शहरातील काही तरुण पेटी फोडून, त्यातले पैसे पिशवीत भरण्याच्या तयारीत असताना, त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची आठवण भावसार यांनी सांगितली. सुमारे सात वर्षांपूर्वी येथे असाच प्रकारची चोरी झाली होती. शहराच्या सीमेवरील मल्हारवाडीचे ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या मंदिरातही चोरी झाली. गाभाऱ्यातील पेटी सभामंडपात मिळून आली. सकाळी देवराम खैरनार यांच्या लक्षात ही घटना आली. तसेच चांडक प्लॉटमधील राम मंदिरातही वरील प्रकारे चोरी झाली. येथील रोख रक्कम काही हजार असल्याची माहिती आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीपुढील त्रिशूळ व डमरु खंडेरावाच्या मंदिराजवळ टाकून दिलेले आढळून आले. नाशिकच्या श्वान पथकातील टॉमी या श्वानाला चोरी झालेल्या सर्व मंदिरांमध्ये नेण्यात आले. परंतु तो परिसरातच घुटमळला. पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे, पोलीस निरीक्षक अरुण निकम, महेश महाले पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर)