शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

नांदगाव पंचायत समितीत मनमानी

By admin | Updated: November 24, 2015 23:09 IST

शशिकांत मोरे यांची तक्रार

नाशिक : नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असून, त्यांनी ठरावीक कर्मचाऱ्यांना त्याच त्या विभागात कामकाज करण्याची वारंवार संधी दिल्याने भ्रष्टाचार बळावत चालल्याची तक्रार नांदगाव पंचायत समितीचे सदस्य शशिकांत मोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव पंचायत समिती कार्यालय अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत कार्यरत असलेले लिपिक अनिल पाटील यांची तक्रारीच्या कारणास्तव बदली करण्यात आली होती; मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा अनिल पाटील यांची त्याच विभागात बदली झाल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत जरी अनिल पाटील कागदोपत्री काम करीत नसले तरीसुद्धा पडद्याआडून पाटील हेच कामकाज पाहत असल्याचा आरोप शशिकांत मोरे यांनी केला आहे. पाटील यांच्याकडे दिलेले टंचाई, समाजकल्याण या विभागाचे कामकाज तत्काळ काढून घेऊन त्यांना पुन्हा आस्थापना विभागात देण्यात यावे व ते इतर विभागांतील कामकाजात जो हस्तक्षेप करीत आहेत, ते त्वरित थांबविण्यात यावे. तसेच वरिष्ठ सहायक विनय सोनवणे व माजी सभापती विलास अहेर आणि अनिल पाटील हे तिघे मिळून पंचायत समितीचा कारभार करीत असल्याचा आरोप शशिकांत मोरे यांनी केला आहे. पंचायत समितीतील कामकाज नियमानुसार करून ठरावीक व्यक्तींचा हस्तक्षेप टाळावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)