शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडीद्वारे कचरा संकलनास प्रारंभ नांदगाव : स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:29 IST

नांदगाव : शहरातील कचरा संकलन करून घंटागाडीद्वारे घनकचरा डेपोवर वाहून नेणे या कामाचा उद्घाटन समारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे होते.

ठळक मुद्दे नांदगाव : स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद घंटागाडीद्वारे कचरा संकलनास प्रारंभ

नांदगाव : शहरातील कचरा संकलन करून घंटागाडीद्वारे घनकचरा डेपोवर वाहून नेणे या कामाचा उद्घाटन समारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे होते.प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी सुहास कांदे म्हणाले, पहिले घर स्वच्छ करा. आरोग्य राखा. रोगराई दूर करा. नगराध्यक्ष राजेश कवडे चांगले काम करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात कामांचा रोडमॅप तयार केला आहे. शिवसेना व भाजपा या आमच्या सरकारच्या माध्यमातून शहराच्या अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. घनकचरा व्यवस्थापनाला नागरिकांनी सहकार्य करावे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा. काही दिवस आधी ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांच्या आढावा बैठकीत प्रशासन व लोकप्रतिनिधी यात समन्वय नाही हा संदेश दिला गेला. तसे पुन्हा होऊ नये. लोकप्रतिनिधींना जनता कामे करण्यासाठी निवडून देते. त्याचा विचार करून प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन कांदे यांनी केले.ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे म्हणाले की, सुधारणा करून २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांवर नगराध्यक्षांनी आणला. प्रास्ताविकात मुख्याधिकारी यांनी कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबविला जात आहे, अशी माहिती दिली.उपनगराध्यक्ष शोभाताई कासलीवाल, कुदरतअली शहा, महावीर जाधव, सचिन साळवे, दीपक बंगाळे, किरण देवरे, मनीषा काकळीज, सुनंदा पवार, संगीता जगताप, कारभारी भीमा शिंदे, वाल्मीक टिळेकर, किरण देवरे, नितीन जाधव, बालेमिया शेख, सुरज पाटील, अभिषक सोनवणे, महावीर पारख, विनता पाटील, वंदना कवडे, चांदणी खरोटे, सविता शेवरे, योगिता गुप्ता, कामिनी साळवे, सुनंदा पवार, नंदा कासलीवाल, सुनील ढासे, प्रकाश कायस्थ, गणेश पाटील, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महिरे यांनी केले.